कियाराला हवंय कोणासारखं बाळ? थेट करिना कपूरचा नाव घेत म्हणाली; मला तिच्यातले...
Kiara Advani And Sidharth Malhotra : कियारा आडवाणी लवकरच आई होणार आहे. याबाबत तिने आणि तिचा पती सिद्धार्थ मल्होत्रा यांनीच माहिती दिली आहे.

Kiara Advani Pregnancy : बॉलिवुड जगतातील सर्वाधिक लोकप्रिय असलेली कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) यांच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. याबाबत या दोघांनीही नुकतीच घोषणा केली आहे. दरम्यान, त्यांना लवकरच बाळ होणार असल्याची घोषणा केल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. असे असतानाच आता कियारा आडवाणीचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती माझ्या मुलांमध्ये करिना कपूरच्या तीन खास गोष्टी यायला हव्यात, असे म्हणताना दिसतेय.
कियाराचा जुना व्हिडीओ होतोय व्हायरल
कियारा आडवाणी लवकरच आई होणार असल्याचे समजल्यानंतर तिचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती तिच्या होणाऱ्या बाळांविषयी बोलताना दिसत आहे. कियाराचा तेव्हा गुड न्यूज हा चित्रपट आला होता. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती 'हंगामा'ला मुलाखत द्यायला गेली होती. यावेळी तिने बाळाविषयी बऱ्याच गप्पा केल्या होत्या.
मला एक मुलगा आणि एक मुलगी हवीय
या मुलाखतीत तुला ट्विन्स झाली तर दोघेही मुलं असावीत की मुली? असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना 'मला फक्त दोन स्वस्थ मुलं हवी आहेत,' असं उत्तर दिलं होतं. या उत्तरानंतर करिना कपूरने कियाराशी मस्करी केली होती. त्यानंतर मला एक मुलगा हवा आहे आणि एक मुलगी हवी आहे, अशी इच्छा व्यक्त केली होती.
करिना कपूरचे कोणते गुण हवे आहेत?
याच मुलाखतीत कियारा आडवाणीला तुला तुझ्या बाळामध्ये करिना कपूरमध्ये असलेले कोणते तीन गुण असावेत असे वाटते? असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देतना मला माझ्या मुलांमध्ये करिनासारखा आत्मविश्वास, करिनासारखे हाव-भाव, तसेच करिनासारखी आभाव टाकण्याची क्षमता हे गुण हवे आहेत, असे कियारा म्हणाली होती.
View this post on Instagram
दरम्यान, कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी एकत्रितपणे इन्स्टाग्रामच्या माध्यमातून लवकरच ते आई-बाबा होणार असल्याचे जाहीर केले होते. आमच्या जीवनातील सर्वाधिक मौल्यवाण भेट आम्हाला मिळणार आहे, असं ही गोड बातमी सार्वजनिक कराताना सांगितलं होतं. ही बाब सार्वजनिक होताच सिनेजगतातील अनेकांनी या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. यात आलिया भट्ट, करिना कपूर, शिल्पा शेट्टी, सोनाक्षी सिन्हा, नेहा धुपिया आदी बड्या कलाकारांचा समावेश आहे. अभिनेत्री कियारा आडवाणी लवकरच वॉर-2 या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा पहिला भाग सुपरहिट ठरला. आता याच चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची सगळे वाट पाहात आहेत.
हेही वाचा :
वय वर्षे 51, पण रुप असं की वाटते 25 वर्षांची तरुणी; मलायका अरोराचे नवे फोटो पाहिलेत का?























