FIFA WC 2022: इंग्लंडची क्वार्टर फायनलमध्ये धडक; सेनेगलला 3-0 नं हरवलं
FIFA World Cup 2022: कतारमध्ये (Qatar) खेळल्या जात असलेल्या फुटबॉल विश्वचषकात इंग्लंडचा संघ सातत्यानं चांगली कामगिरी करत आहे.
![FIFA WC 2022: इंग्लंडची क्वार्टर फायनलमध्ये धडक; सेनेगलला 3-0 नं हरवलं FIFA WC 2022 England Blank Senegal 3-0; Set To Face France in Quarters FIFA WC 2022: इंग्लंडची क्वार्टर फायनलमध्ये धडक; सेनेगलला 3-0 नं हरवलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/05/a716e787b5c0d3e35c8dc01051a8d6211670219863820266_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
FIFA World Cup 2022: कतारमध्ये (Qatar) खेळल्या जात असलेल्या फुटबॉल विश्वचषकात इंग्लंडचा संघ सातत्यानं चांगली कामगिरी करत आहे. रविवारी खेळण्यात आलेल्या प्री- क्वार्टर फायनल सामन्यात इंग्लंडनं सेनेगलचा (England vs Senegal) 3-0 नं पराभव केला. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन (Harry Kane), जॉर्डन हेंडरसन (Jordan Henderson) आणि युवा स्टार बुकायो (Bukayo) यांनी प्रत्येकी एक-एक गोल करत संघाला विजय मिळवून दिला.
ट्वीट-
England move on to the last 8!@adidasfootball | #FIFAWorldCup
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 4, 2022
ट्वीट-
Two more Round of 16 matches in the books, we go again tomorrow!#FIFAWorldCup | #Qatar2022
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 4, 2022
हॅरी केनचा जबरदस्त गोल
या सामन्यात सुरुवातीपासूनच इंग्लंड संघाने सेनेगलवर दबाव कायम ठेवला. इंग्लंडनं सेनेगलच्या संघाला गोल करण्याची एकही संधी दिली नाही. अनुभवी खेळाडू जॉर्डन हेंडरसननं सामन्याच्या 38व्या मिनिटाला पहिला गोल केला. यानंतर हॅरी केनची जादूही पाहायला मिळाली. फिल फोडेनच्या पासवर हॅरी केननं आपल्या संघासाठी दुसरा गोल केला. त्याचा विश्वचषकाच्या इतिहासातील हा सातवा आणि या विश्वचषकातील पहिला गोल होता.
इंग्लंडचा एकतर्फी विजय
इंग्लंडच्या संघानं पहिल्या हाफपूर्वीच सेनेगलवर 2-0 अशी आघाडी घेतली. यानंतर हाफ टाईमनंतर 57व्या मिनिटाला बुकायो साकाने इंग्लंडसाठी तिसरा गोल केला. या गोलसह इंग्लंड संघाने सेनेगलवर 3-0 अशी भक्कम आघाडी घेतली. यानंतर इंग्लंडनं सेनेगलला एकही संधी दिली नाही आणि सामना 3-0 अशा मोठ्या फरकानं जिंकला.
दहाव्यांदा इंग्लंडची विश्वचषकाच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक
सेनेगलविरुद्ध विजयासह इंग्लंडच्या संघानं फुटबॉल विश्वचषकाच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक दिली. इंग्लंडनं दहाव्यांदा फुटबॉल विश्वचषकाच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक दिली. यापूर्वी इंग्लंडचा संघ 1954, 1962, 1966, 1970, 1986, 1990, 2002, 2006 आणि 2018 मध्ये क्वार्टर फायनलमध्ये पोहचला होता. क्वार्टर फायनलमध्ये इंग्लंडचा सामना फ्रान्सशी होणार आहे.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)