एक्स्प्लोर

IND vs BAN: सामना जिंकून दिला अन् इतिहासही रचला; मेहंदी हसन आणि मुस्तफिजुर रहमानच्या नावावर खास विक्रमाची नोंद

IND vs BAN 1st ODI: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात रविवारी पहिला एकदिवसीय सामना खेळला गेला.

IND vs BAN 1st ODI: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात रविवारी पहिला एकदिवसीय सामना खेळला गेला. या थरारक सामन्यात भारताला एका विकेटनं पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह भारतीय संघ तीन सामन्यांच्या एक दिवसीय मालिकेत 1-0 नं पिछाडीवर गेलाय. मेहंदी हसन (Mehndi Hasan) आणि मुस्तफिजून रहमाननं (Mustafizur Rehman) भारताच्या तोंडातून विजयी घास हिसकावून बांगलादेशला विजय मिळवून दिला. तसेच दहाव्या विकेटसाठी नाबाद 51 धावांची भागिदारी करत खास विक्रमाला गवसणी घातली.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना ढाकाच्या श्री बांगला नॅशनल स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात मेहंदी हसन आणि मुस्तफिजूर रहमाननं दहाव्या विकेट्ससाठी 51 धावांची विजयी भागिदारी केली. बांगलादेशकडून भारताविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये दहाव्या विकेटसाठी ही सर्वात मोठी भागीदारी ठरली. यापूर्वी 2003 मध्ये बांगलादेशनं भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यात दहाव्या विकेटसाठी 25 धावांची भागीदारी केली होती.

ट्वीट-


मेहंदी हसन आणि मुस्तफिजूर रहमानची महत्वपूर्ण भागीदारी
भारताला 187 धावांवर रोखल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या बांगलादेशच्या संघाचीही दमछाक झाली. बांगलादेशनं 136 धावांवर नऊ विकेट्स गमावल्या.मात्र, मेहंदी हसननं संघाचा डाव सावरत संघाला विजयापर्यंत पोहचवलं.हसन महमूद बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या मुस्तफिजुर रहमाननं मेहंदी हसनला चांगली साथ दिली. त्यानं 11 चेंडूत दोन चौकारांच्या मदतीनं 10 धावा केल्या. तर, मेहंदीनं नाबाद 38 धावांची खेळी केली. मेहदी हसन आणि मुस्तफिझूर यांनी दहाव्या विकेटसाठी 51 धावांची विजयी भागीदारी केली. दोघांनीही भारतीय गोलंदाजांना एकही संधी दिली नाही.

भारत 1-0 नं पिछाडीवर
पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेकीचा कौल बांगलादेशच्या बाजूनं लागला. त्यानंतर बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसननं भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. बांगलादेशच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय संघ संघर्ष करताना दिसला. भारतीय संघ निर्धारित 50 षटकात 186 धावांवर ऑलआऊट झाला. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशच्या संघाचीही दमछाक झाली. मोहम्मद सिराज, कुलदीप सेनच्या भेदक माऱ्यापुढं बांगलादेशच्या संघानं गुडघे टेकले. बांगलादेशनं 136 धावांवर हसन महमूदच्या रुपात नववी विकेट गमावली. परंतु,  मेहंदी हसन आणि मुस्तफिजूर रहमानची महत्वपूर्ण भागिदारी करत बांगलादेशला विजय मिळवून दिला.

हे देखील वाचा-

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Ind vs Sl 1st Test : कधी तोंडही दाखवू नको...; LIVE सामन्यात भारताचे 2 समालोचक भिडले, एकमेकांना नको ते बोलत बसले, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
कधी तोंडही दाखवू नको...; LIVE सामन्यात भारताचे 2 समालोचक भिडले, एकमेकांना नको ते बोलत बसले, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
IND vs SL 1st Test DAY-4 Live : श्रीलंकेचा डाव 284 धावांत गडगडला! भारताला 178 धावांची आघाडी, आता गॉलमध्ये टीम इंडियाचा ‘मास्टरप्लॅन’!
श्रीलंकेचा डाव 284 धावांत गडगडला! भारताला 178 धावांची आघाडी, आता गॉलमध्ये टीम इंडियाचा ‘मास्टरप्लॅन’!
Basit Ali Heart Attack : छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?
छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Embed widget