एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MS Dhoni | 'या' तीन क्षणांनी महेंद्र सिंह धोनीला भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात अढळ स्थान मिळवून दिलं
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधर महेंद्र सिंह धोनीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून सन्यास घेतला आहे. मात्र, महेंद्र सिंह धोनीला भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात अढळ स्थान आहे. धोनीला हे स्थान मिळवून देणारे त्याच्या कारकिर्दीतील महत्वाचे क्षण.
मुंबई : 2007 चा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक.. 2011 चा वन डे विश्वचषक आणि 2013 ची चॅम्पिय़न्स ट्रॉफी.. हेच ते तीन क्षण ज्या तीन क्षणांनी महेंद्रसिंग धोनीला भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात अढळ स्थान मिळवून दिलं.
महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण त्यांच्या लाडक्या धोनीनं निवृत्तीचा सामना खेळावा अशी त्यांची अपेक्षा होती. पण धोनीनं यंदाच्या आयपीएलच्या आधी आंतराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीला पूर्णविराम दिलाय.
2007 साली ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट नुकतच बाळसं धरु लागलं होतं. त्याचवेळी पहिल्यावहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकासाठी भारतीय निवड समितीनं महेंद्र सिंह धोनीच्या खांद्यावर संघाची धुरा सोपवली. धोनीच्या त्या युवा संघानं दक्षिण आफ्रिकेत कमाल केली. धोनीच्या कुशल नेतृत्वामुळे भारतानं पहिल्याच टी ट्वेन्टी विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. आणि धोनी क्रिकेटरसिकांच्या गळ्यातला ताईत बनला.
Suresh Raina Retires | महेंद्र सिंह धोनी पाठोपाठ सुरेश रैनाची आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती
2007 नंतर धोनीकडे वन डे आणि कसोटी संघाचीही जबाबदारी आली. 2009 साली त्यानं भारताला कसोटी क्रमवारीत नंबर वनवर नेऊन ठेवलं. त्यानंतर 600 पेक्षा जास्त दिवस भारतीय संघ कसोटीत पहिल्या स्थानावर कायम होता. धोनीच्या नेतृत्वात भारतानं घरच्या मैदानात 21 कसोटी जिंकण्याचा पराक्रम गाजवलाय.
MS Dhoni Retires: महेंद्रसिंह धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास
2011 चा वन डे विश्वचषक हा धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीतला मानबिंदू ठरावा. कारण धोनीच्या टीम इंडियानं मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 28 वर्षानंतर भारताला दुसऱ्यांदा विश्वचषक मिळवून दिला. त्यात धोनीचा सिंहाचा वाटा होता. फायनलमध्ये धोनीनं लॉन्ग ऑनला खेचलेला तो विजयी षटकार आजही प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याच्या मनात कोरला गेलाय.
2013 साली धोनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. इंग्लंडमधल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतानं विजेतेपदाचा मान मिळवला. आणि आयसीसीच्या तीनही मानाच्या स्पर्धा जिंकून देणारा धोनी हा भारताचा एकमेव कर्णधार ठरला.
MS Dhoni Retires | कॅप्टन कूल धोनीच्या निवृत्तीवर सचिन, विराटची प्रतिक्रिया, म्हणाले...
350 वन डे, 90 कसोटी आणि 98 ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांत मिळून धोनीच्या खात्यात 17 हजार 266 आंतरराष्ट्री धावा जमा आहेत. वन डेत दहा हजार धावा करणाऱ्याचा मानही धोनीनं मिळवलाय. यष्टीमागेही त्यानं कमाल करताना आजवर तब्बल 829 फलंदाजांना माघारी धाडलंय. धोनीच्या नेतृत्वात भारतानं आजवर 110 वन डे, 27 कसोटी आणि 42 टी ट्वेन्टी सामने जिंकले आहेत.
ही आकडेवारी आणि गेल्या सोळा वर्षातली अजोड कामगिरी धोनीच्या महानतेची साक्ष देते. म्हणूनच धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी भारतीय क्रिकेटमधलं त्याचं स्थान ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ राहिल.
MS Dhoni Retired | महेंद्रसिंग धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास, कॅप्टन कूलची निवृत्ती
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement