एक्स्प्लोर
Advertisement
Suresh Raina Retires | महेंद्र सिंह धोनी पाठोपाठ सुरेश रैनाची आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती
माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी पाठोपाठ फलंदाज सुरेश रैनाने देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे.
मुंबई : जगभरातील क्रिकेट चाहत्यांना दुसरा धक्का बसणार आहे. कारण, महेंद्र सिंह धोनी पाठोपाठ आता फलंदाज सुरेश रैनाने देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घोषित केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत सुरेश रैनाने क्रिकेट मधून सन्यास घेतल्याचं जाहीर केलं आहे.
सुरेश रैनाने धोनी आणि टीम इंडियाच्या काही सहकाऱ्यांसोबत एक फोटो शेअर केला आहे. माही, तुमच्या सोबत खेळणे शानदार राहिले. तुमच्या कारकिर्दीत खेळायला भेटले याचा अभिमान आहे, धन्यवाद भारत, जय हिंद, असे शब्द सुरेश रैनाने धोनीसाठी लिहले आहेत.
सुरेश रैना आणि महेंद्र सिंह धोनी यांची मैत्रि जगजाहिर आहे. दोघेही अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स टिमकडून खेळत आहेत. दोघांनीही अनेकवेळा ऐकमेकांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सुरेश रैनाच्या आंतराष्ट्रीय क्रिकेट करियरमध्ये 18 टेस्ट मॅच, 226 वनडे सामने आणि 78 टी-20 इनटरनॅशनल मॅचमध्ये खेळला आहे. रैनाने एक शतक आणि सात अर्धशतकच्या जोरावर टेस्ट क्रिकेटमध्ये 768 रन बनवले आहेत. तर वनडेमध्ये रैनाने पाच शतक आणि 36 अर्धशतकी खेळ्या केल्या आहेत. यादरम्यान, 35 च्या सरासरीने 5615 रन काढले आहेत. MS Dhoni Retires: मै पल दो पल का शायर हूँ... निवृत्ती जाहीर करताना महेंद्र सिंह धोनी भावूक रैना हा फटकेबाजीसाठी ओळखला जातो. त्याने आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय करियरमध्ये 66 खेळी केल्या. यात 29 च्या सरासरीने 1605 रन काढले आहेत. या काळात त्याने शतक आणि पाच अर्धशतक नावावर केले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement