Indonesia Stampede: इंडोनेशियाच्या फुटबॉल स्टेडियममध्ये चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा 170 वर; दोषींवर कारवाईचे आदेश
Indonesia Government: फुटबॉल स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीबाबत इंडोनेशिया सरकारनं मोठा निर्णय घेतलाय.

Indonesia Government: फुटबॉल स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीबाबत इंडोनेशिया सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. या घटनेसाठी जबाबदार असलेल्या लोकांची ओळख पटवून त्यांना शिक्षा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत 170 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. तर, अनेकजण गंभीररित्या जखमी झाले आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेचं वर्णन फुटबॉल इतिहासातील सर्वात मोठी आपत्ती म्हणूनही करण्यात आलंय.
इंडोनिशियाचे मुख्य सुरक्षमंत्री काय म्हणाले?
इंडोनिशियाचे मुख्य सुरक्षमंत्री महफूद एमडीनं सांगितलंय की, "आम्ही राष्ट्रीय पोलिसांची चर्चा केली. तसेचया घटनेतील गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत."
नेमक प्रकरण काय?
इंडोनिशियाच्या मलंग शहरातील एका मोठ्या स्टेडियममध्ये अरेमा एफसी आणि पर्सेबाया सुराबाय यांच्यात फुटबॉल सामना रंगला होता. मात्र, सामन्यात पर्सेबाया सुराबाय संघानं अरेमा एफसीवर मात करत सामना 3-2 नं जिंकला. त्यानंतर अरेमा एफसी संघाच्या चाहत्यांनी मैदानावर येत गोंधळ घालायला सुरुवात केली. ज्यामुळं दोन्ही संघाच्या चाहत्यांमध्ये वाद सुरू झाला आणि परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेल्यानं तेथील सुरक्षारक्षकही आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करू लागले. दोन्ही संघाच्या चाहत्यांमधील वाढता वाद पाहता नॅशनल आर्म फोर्सला घटनास्थळी बोलवण्यात आलं. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. घटनास्थळी पोहचलेल्या जवानांनी सर्वांना बाहेर काढलं. स्टेडियमच्या बाहेर आल्यानंतरही दोन्ही संघाच्या समर्थकांमध्ये पुन्हा एकदा हाणामारी सुरु झाली.
बीआरआई लीगचे सर्व सामने एक आठवड्यासाठी स्थगित
इंडोनेशियातील या घटनेला स्टेडियममधील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या घटनापैकी एक म्हटलं जातंय. या घटनेदरम्यान दोन्ही समर्थकांमध्ये जाळपोळही करण्यात आली. अरेमा एफसीच्या चाहत्यांनी स्टेडियमबाहेर उभ्या असलेल्या पोलिसांच्या गाड्या जाळल्या. या अपघातात स्टेडियममध्ये 34 जागीच मृत्यू झालाय. तर, अनेकांचा उपचारदरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. याप्रकरणी पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतलंय. या घटनेत दोन पोलिसांचाही मृत्यू झालाय. इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तया घटनेनंतर इंडोनेशिया बीआरआई लीगचे सर्व सामने एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले आहेत.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
