India vs New Zealand: भारताचा डाव गडगडला; न्यूझीलंडकडे 301 धावांची भक्कम आघाडी, टीम इंडिया संकटात
India vs New Zealand: न्यूझीलंडकडे आता 301 धावांची आघाडी आहे.
India vs New Zealand Second Test: भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडने पहिल्या डावात 259 धावा केल्या. न्यूझीलंडने केलेल्या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला फक्त 156 धावा करता आल्या. त्यामुळे न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 5 बाद 198 धावा केल्या आहेत त्यामुळं त्यांच्याकडे आता 301 धावांची आघाडी आहे.
भारताकडून यशस्वी जैस्वालने 30 धावा केल्या. तर कर्णधार रोहित शर्मा एकही धावा न करता बाद झाला. शुभमन गिलने 30 धावा, विराट कोहली 1 धाव करत बाद झाला. ऋषभ पंतने 18, सर्फराज खान 11, रवीचंद्रन अश्वीनने 4, रवींद्र जडेजाने 38, वॉशिंग्टन सुंदरने 18 आकश दीपने 6 तर जसप्रीत बुमराहने एकही धाव केली नाही. न्यूझीलंडकडून सर्वाधिक मिचेल सँटनरने 7 विकेट्स घेतल्या. तर ग्लेन फिलिप्सने 2, टीम साऊदीने 1 विकेट्स घेतल्या.
न्यूझीलंडच्या संघानं दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 5 बाद 198 धावा केल्या आहेत. टॉम लॅथमनं 86 धावांची खेळी केली. तर, भारताकडून वॉशिंग्टन सुंदरनं 4 तर अश्वीननं 1 विकेट घेतली.
पहिल्या डावात वॉशिंग्टन सुंदर अन् अश्वीनच्या फिरकीपुढं न्यूझीलंडचा संघ अडकला-
काॅनवे आणि रचिन यांनी शानदार अर्धशतकी खेळी केली. मात्र त्यानंतर वाॅशिग्टन सुंदरने न्यूझीलंडच्या डावाला सुरुंग लावला. 3 बाद 197 अशा सुस्थितीत न्युझीलंड दिसत असताना वाॅशिंग्टन सुंदरच्या माऱ्यासमोर न्यूझीलंडचा डाव अवघ्या 259 धावांमध्ये आटोपला. न्यूझीलंडने अवघ्या 62 धावांत 7 फलंदाज गमावले. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या दिवशी मोठे यश मिळालं. टीम इंडियाकडून वॉशिंग्टन सुंदरने अवघ्या 59 धावांमध्ये सात बळी टिपले, तर अश्विनने सुंदर साथ देताना 64 धावांमध्ये तीन बळी टिपले. न्यूझीलंडचे चार फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाले.
न्यूझीलंडचा पहिला डाव कसा राहिला?
पुणे कसोटीच्या पहिल्या डावात न्यूझीलंडने 259 धावा केल्या. पुणे कसोटीच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला किवी संघ 259 धावांत सर्वबाद झाला. न्यूझीलंडकडून सलामीवीर ड्वेन कॉनवेने सर्वाधिक 76 धावा केल्या. याशिवाय बंगळुरू कसोटीचा हिरो रचिन रवींद्रने 65 धावांचे योगदान दिले. भारतासाठी वॉशिंग्टन सुंदर हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. वॉशिंग्टन सुंदरने 7 विकेट्स घेतल्या.
दुसऱ्या कसोटीसाठी भारताची प्लेईंग इलेव्हन-
यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह.
दुसऱ्या कसोटीसाठी न्यूझीलंडचा प्लेइंग इलेव्हन-
टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, टिम साऊदी, मिचेल सँटनर, एजाज पटेल, विल्यम ओरुके.