Dhananjay Munde : वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
Dhananjay Munde : मंत्री धनंजय मुंडे यांनी आज (दि.16) परळीत जनता दरबार आयोजित केला होता.
Dhananjay Munde, Parli : मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड (Walmik Karad)याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याला कोर्टाकडून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, यापूर्वी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंसाठी (Dhananjay Munde) काम करत होता. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मतदारसंघाची जबाबदारी वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्यावर सोपवली होती.
https://t.co/8wiEe0R22R pic.twitter.com/ZlBt6VCAd1
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 16, 2025
जगमित्र कार्यालयात धनंजय मुंडे यांनी घेतला जनता दरबार..
जगमित्र कार्यालयात आज मंत्री धनंजय मुंडे यांनी जनता दरबार घेतलाय. याच कार्यालयात वाल्मीक कराड हा सुद्धा पूर्ण वेळ मतदारसंघाच्या लोकांचे कामे बघायचा..राज्याचे अन्न पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी विधानसभा मतदारसंघातील बहुतेक कामं वाल्मीक कराड बघायचा.. याच जगमित्र कार्यालयातून वाल्मीक कराड हा मतदारसंघातील काम पाहायचा.. कामासाठी येणारे लोक या कार्यालयात येत असत.. फॉर्मिक कराडला संतोष देशमुख हत्याप्रकरणी आणि खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर धनंजय मुंडे हे जगमित्र कार्यालयात बसून लोकांना भेटत आहेत आज त्यांनी जनता दरबार सुद्धा घेतला..एरवी धनंजय मुंडे सुद्धा याच कार्यालयात बसून कामासाठी येणाऱ्या लोकांना भेटत असतात मात्र आज वाल्मीक कराडच्या अनुपस्थितीमध्ये धनंजय मुंडे यांनी जनता दरबार घेतला.
आज नियमित प्रमाणे परळीत आल्यानंतर प्रभु वैद्यनाथांचे विधिवत पूजन करून दर्शन घेतले. त्यानंतर आपल्या जगमित्र कार्यालयामध्ये भेटीसाठी मतदारसंघातून व मतदारसंघाच्या बाहेरून आलेल्या नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधत त्यांची कामे समजून घेतली व ती मार्गी लावण्याबाबत… pic.twitter.com/KTCnASbR8A
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 16, 2025
जगमित्र कार्यालयामध्ये भेटीसाठी मतदारसंघातून आलेल्या लोकांची गर्दी
धनंजय मुंडे यांनी नेहमीप्रमाणे परळीत आल्यानंतर प्रभु वैद्यनाथांचे विधिवत पूजन करून दर्शन घेतले. त्यानंतर आपल्या जगमित्र कार्यालयामध्ये भेटीसाठी मतदारसंघातून व मतदारसंघाच्या बाहेरून आलेल्या नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. भेटण्यासाठी आलेल्या लोकांची कामे समजून घेतली व ती मार्गी लावण्याबाबत आवश्यक कार्यवाही केली.
मकोका लागलेल्या आणि तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडमुळे खरंतर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंची कोंडी झाल्याची चर्चा सुरू झालीय. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा जवळचा असल्याचा आरोप आहे...त्यामुळेच मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी, भाजपचे आमदार सुरेश धस, मनोज जरांगे यांच्यासह विरोधकांनी लावून धरलीय. आता वाल्मिक कराडला मकोका लागल्यानं धनंजय मुंडेंची अजून कोंडी झालीय.
इतर महत्त्वाच्या बातम्या