Doctors On Saif ali Khan : सैफ अली खानला ऑपरेशन शिएटरमधून आयसीयूमध्ये हलवलं
Doctors On Saif ali Khan : सैफ अली खानला ऑपरेशन शिएटरमधून आयसीयूमध्ये हलवलं
सैफ अली खानच्या घरी गेल्या दोन-तीन दिवसांपासून फरशी पॉलिश करण्याचे काम सुरू आहे. पोलीस या मजुरांचीही चौकशी करत आहेत. पोलिसांनी सैफ अली खानच्या घराचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा कोणीही येताना किंवा जाताना दिसले नाही. सैफवर हल्ला करणारा आरोपी चोरीच्या उद्देशाने घरात घुसला असावा असा पोलिसांना सुरुवातीला संशय आहे. या संदर्भात, पोलिस गेल्या आठवड्यात घरी कामावर आलेल्या एका व्यक्तीची चौकशी करत आहेत.सैफ अली खानच्या टीमने एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. यामध्ये त्यांनी सांगितलं, सैफ अली खानवर शस्त्रक्रिया झाली आहे आणि तो धोक्याबाहेर आहे. सैफ अली खानची प्रकृती सुधारत आहे आणि डॉक्टर त्याच्यावर पूर्णपणे लक्ष ठेवून आहेत. कुटुंबातील सर्व सदस्य सुरक्षित आहेत आणि पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. लीलावती रुग्णालयातील डॉ. निरज उत्तमनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सैफ अली खानला मध्यरात्री 3.30 वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर 6 वार झाले होते. यापैंकी दोन जखमा खोल होत्या, एक जखम पाठीचा कण्याजवळ, तर दुसरी जखम मानेजवळ होती'.