एक्स्प्लोर

शोएब अख्तर अंगावर धावून आला, हरभजन सिंगनेही उचलली बॅट अन्...; मैदानात काय घडलं?, VIDEO आला समोर

अख्तर आणि भज्जी यांच्यात मैदानावर अनेक शाब्दिक चकमकी झाल्या आहेत.

Harbhajan Singh And Shoaib Akhtar : टीम इंडियाचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग आणि पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर हे मैदानाबाहेर खूप चांगले मित्र आहेत. पण मैदानाच्या आत अजूनही दोघांमध्ये संघर्ष पाहिला मिळत आहे. अख्तर आणि भज्जी यांच्यात त्यांच्या काळात मैदानावर अनेक शाब्दिक चकमकी झाल्या आहेत. आता पुन्हा एकदा दोन दिग्गजांमध्ये एक मजेदार सामना पाहायला मिळाला, जिथे ते मस्करी करत एकमेकांना बॅट आणि बॉलने मारण्याची तयारी करत होते. 

अख्तर आणि हरभजन यांच्यातील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, भज्जी आणि अख्तर एकमेकांना मजेदार पद्धतीने मारण्यासाठी पुढे जाताना दिसत आहेत. हा व्हिडिओ आंतरराष्ट्रीय लीग टी-20 मधील आहे. अख्तरने स्वतः हा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये हरभजन सिंग हातात प्लास्टिकची बॅट धरलेला दिसतो. अख्तरच्या हातात चेंडू आहे. दोघेही पद्धतीने एकमेकांना मारण्यासाठी जाताना दिसत आहे. अख्तर बॉल दाखवतो आणि भज्जी बॅट दाखवतो. यानंतर दोघेही एकमेकांना ढकलतात. या व्हिडिओला कॅप्शन देताना अख्तरने लिहिले की, "चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी करण्याचा हा आमचा मार्ग आहे."

2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होण्यासाठी फक्त काही दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे क्रिकेट जगतात उत्साह वाढला आहे. माजी क्रिकेटपटूही या मोठ्या स्पर्धेबद्दल उत्साहित असल्याचे दिसून येते. या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी दोन्ही संघांमधील ऐतिहासिक प्रतिस्पर्ध्याबद्दल चर्चा तीव्र झाल्या आहेत. 2017 मध्ये शेवटची चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवण्यात आली होती, तेव्हा पाकिस्तानने भारताला हरवून जेतेपद पटकावले होते. त्यामुळे, यावेळी पाकिस्तान गतविजेत्या म्हणून मैदानात उतरेल. त्याच वेळी, भारताने आतापर्यंत दोनदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे, ज्याचे शेवटचे विजेतेपद 2013 मध्ये होते.

भारत आणि पाकिस्तान यांना न्यूझीलंड आणि बांगलादेशसह एकाच गटात स्थान देण्यात आले आहे. पाकिस्तान 19 फेब्रुवारी रोजी न्यूझीलंडविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल, तर भारत 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध खेळेल. 23 फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक हाय-व्होल्टेज सामना होणार आहे, जो क्रिकेट चाहत्यांसाठी आणखी एक रोमांचक दृश्य असेल. भारत आणि पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये 23 फेब्रुवारी रोजी दुबई येथे दुपारी 2.30 वाजता आमनेसामने येतील. जरी ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये आयोजित केली जात असली तरी, सुरक्षेच्या कारणास्तव भारताने तेथे खेळण्यास नकार दिला, ज्यामुळे त्यांचे सामने तटस्थ ठिकाणी खेळले जातील.

हे ही वाचा -

Champions Trophy 2025 : एकाचे डोके फुटले तर दुसऱ्याला हॅमस्ट्रिंग! 2 दिवसांत 3 खेळाडू गंभीर जखमी, चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Rada Mastermind : कोण आहे नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंड? ते अकाउंट कोणाचं?Yujvendra Chahal Divorced : युजवेंद्र चहल-धनश्री वर्माचा अखेर घटस्फोट, फॅमिली कोर्टाकडून मंजूरीZero Hour : दिशा सालियनच्या कुटुंबावर दबाव?  आदित्य ठाकरे अडचणीत येणार?Special Report on Aaditya Thackeray : दिशाच्या वडिलांची याचिका, आदित्य ठाकरे अडचणीत येणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
भारत सरकारचे अधिकारी कंटेंट ब्लॉक करत आहेत, हा आयटी कायद्याचा दुरुपयोग सुरुय! एलॉन मस्क यांच्या X ची केंद्र सरकारविरोधात याचिका
भारत सरकारचे अधिकारी कंटेंट ब्लॉक करत आहेत, हा आयटी कायद्याचा दुरुपयोग सुरुय! एलॉन मस्क यांच्या X ची केंद्र सरकारविरोधात याचिका
हिंजवडीतील टेम्पो जळीतकांड अपघात नसून घातपात; पोलिसांनी लावला छडा, ड्रायव्हरनेच टॅम्पो जाळला
हिंजवडीतील टेम्पो जळीतकांड अपघात नसून घातपात; पोलिसांनी लावला छडा, ड्रायव्हरनेच टॅम्पो जाळला
बीडमध्ये आणखी एका गुन्हेगारी टोळीवर मकोका, तीन महिलांचा समावेश; SP नवनीत कावत अ‍ॅक्शनमोडमध्ये
बीडमध्ये आणखी एका गुन्हेगारी टोळीवर मकोका, तीन महिलांचा समावेश; SP नवनीत कावत अ‍ॅक्शनमोडमध्ये
नाशिकमध्ये काय चाललंय काय? रंगपंचमीचं दुहेरी हत्याकांड ताजं असताना टोळक्याच्या मारहाणीचा Video समोर
नाशिकमध्ये काय चाललंय काय? रंगपंचमीचं दुहेरी हत्याकांड ताजं असताना टोळक्याच्या मारहाणीचा Video समोर
Embed widget