Champions Trophy 2025 : एकाचे डोके फुटले तर दुसऱ्याला हॅमस्ट्रिंग! 2 दिवसांत 3 खेळाडू गंभीर जखमी, चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर?
चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यास अजून 10 दिवसही बाकी नाहीत. आतापर्यंत अनेक स्टार खेळाडू दुखापतींमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडले आहेत.

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यास अजून 10 दिवसही बाकी नाहीत. आतापर्यंत अनेक स्टार खेळाडू दुखापतींमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडले आहेत. आता चॅम्पियन्स ट्रॉफी संघात समाविष्ट असलेल्या वेगवेगळ्या संघातील आणखी तीन खेळाडूंच्या दुखापतीमुळे त्यांच्या संघाची चिंता वाढली आहे. दोन दिवसांत तीन खेळाडू जखमी झाले आहेत. अशा परिस्थितीत या खेळाडूंना चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्यावर टांगती तलवार लटकली आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यादरम्यान जेकब बेथेलला झाली दुखापत!
जेकब बेथेल हा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंड संघाचा भाग आहे. भारताविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने 64 चेंडूत 51 धावा केल्या, पण हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे तो दुसरा एकदिवसीय सामना खेळू शकला नाही. आता तिसऱ्या सामन्यासाठी टॉम बँटनला त्याच्या कव्हर म्हणून बोलावण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, जेकबला पुढील एकदिवसीय आणि चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणे कठीण दिसत आहे.
रचिन रवींद्र झाली दुखापत, डोक्याला टाके पडले
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघ आपापसात चार सामन्यांची तिरंगी मालिका खेळत आहेत. तिरंगी मालिकेची सुरुवात 8 फेब्रुवारी रोजी न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याने झाली. या सामन्यादरम्यान किवी संघाला मोठा धक्का बसला. पाकिस्तानच्या डावाच्या 38 व्या षटकात क्षेत्ररक्षण करताना, खुसदिल शाहचा शॉट पकडण्याचा प्रयत्न करत असताना, चेंडू रचिन रवींद्रच्या कपाळावर लागला आणि त्यानंतर रक्त येऊ लागले. मग रवींद्र मैदानाबाहेर गेला. रचिनच्या डोक्याला टाके पडले आहेत. यानंतर, त्याला 10 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातून बाहेर गेला आहे. त्याच वेळी, चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दलही सस्पेन्स आहे.
A tough moment on the field for Rachin Ravindra as an attempted catch turned into an unfortunate injury. 🤕
— FanCode (@FanCode) February 8, 2025
Get well soon, Rachin! pic.twitter.com/34dB108tpF
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज रौफही झाला जखमी
न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज हरिस रौफलाही दुखापत झाली. 37 व्या षटकात गोलंदाजी करताना छातीत दुखू लागल्याने त्याला मैदान सोडावे लागले. पीसीबीने माहिती दिली की हॅरिसला थोडासा साइड स्ट्रेन आहे. तो पुढच्या सामन्यासोबत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही खेळला, पण त्याच्याबद्दलचा सस्पेन्सही वाढला आहे.
हे ही वाचा -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
