भारताचा सामना करण्याआधीच पाकिस्तानला धक्का; शाहिन आफ्रिदी दुखापतग्रस्त झाल्याची चर्चा
Shaheen Afridi : पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यातील सामन्याने आशिया चषकाचा दिमाखात शुभारंभ झाला.
IND Vs PAK, Shaheen Afridi : पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यातील सामन्याने आशिया चषकाचा दिमाखात शुभारंभ झाला. पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने नेपाळचा 238 धावांची पराभव करत विजयी सुरुवात केली. पण शनिवारी, दोन सप्टेंबर रोजी भारताविरोधात होणाऱ्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचे टेन्शन वाढले आहे. पाकिस्तानचा आघाडीचा गोलंदाज शाहिन आफ्रिदी दुखापतग्रस्त झाला आहे. नेपाळविरोधात शाहिन आफ्रिदी याने भेदक मारा केला होता. पहिल्याच षटकात त्याने दोन फलंदाजांना तंबूत पाठवले होते. पण सामन्यावेळी दुखापतीमुळे शाहिन आफ्रिदीला मैदान सोडावे लागले.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदी याची दुखापत किती गंभीर आहे? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळेलेली नाही. भारताविरोधातील महत्वाच्या सामन्याआधी प्रमुख वेगवान गोलंदाज दुखापतग्रस्त झाल्यामुळे पाकिस्तानची चिंता वाढली आहे. नेपाळविरोधात फिल्डिंग करताना शाहिन आफ्रिदी दुखापतग्रस्त झाला होता. त्रास झाल्यानंतर त्याने मैदान सोडले होते. शाहिन आफ्रिदी याने मैदानाबाहेर गेल्यानंतर डॉक्टर आणि फिजिओ यांच्यासोबत चर्चा केली. त्याची दुखापत किती गंभीर आहे, हे समजू शकलेले नाही. नव्या चेंडूने शाहिद आफ्रिदी भारतीय फलंदाजांच्या अडचणी वाढवू शकतो, त्यामुळे मोक्याच्या सामन्यात आफ्रिदी संघात असणं, पाकिस्तानसाठी गरजेचं आहे.
शाहिन आफ्रिदीला जर गंभीर दुखापत असेल तर पाकिस्तानसाठी ही चिंतेची बाब आहे. आशिया चषक आणि वर्ल्ड कप या महत्वाच्या दोन स्पर्धा लागोपाठ होत आहे. त्यादरम्यान महत्वाचा गोलंदाज बाहेर जाणं, संघाला अडचणीत टाकणारे आहे. नेपाळविरोधात शाहिन आफ्रिदीने फक्त 5 षटके गोलंदाजी केली. पाच षटकात शाहिन आफ्रिदीने 27 धावा खर्च करत दोन विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर आफ्रिदीने मैदान सोडले होते.
Shaheen Afridi felt some discomfort and left the field 🤐#PAKvsNEP #AsiaCup2023 pic.twitter.com/U7NI9Dt6kR
— Hamxa 🏏🇵🇰 (@hamxashahbax21) August 30, 2023
शाहिन आफ्रिदीला नेमकी काय दुखापत आहे, हे समजू शकलेले नाही. मुल्तानमध्ये सामन्याच्या दिवशी 38 डिग्री तापमान होते. गरमी जास्त असल्यामुळेही शाहिन आफ्रिदीने मैदान सोडले का? अशा चर्चेचा सूरही काही चाहत्यांचा आहे. शाहिन आफ्रिदीने नेपाळविरोधात फक्त पाच षटके गोलंदाजी केली. भारताविरोधात शाहिन खेळणार का? या चर्चा सुरु झाल्या आहेत. भारताविरोधात शाहिन मैदानात उतरणार का? हे महत्वाचे ठरणार आहे. आशिया चषकाच्या पहिल्याच सामन्यात शाहिन लयीत दिसला होता. नेपाळच्या दोन फलंदाजांना पहिल्याच षटकात माघारी धाडले होते.
आशिया कपसाठी टीम इंडियाचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, इशान किशन, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्ण.
राखीव खेळाडू : संजू सॅमसन
आशिया कपसाठी पाकिस्तानचा संघ
फखर जमां, इमाम उल हक, बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अशरफ, मोहम्मद हारिस, मोहम्मद वसीम जुनिअर, अब्दुल्ला शफीक, उसामा मीर, सऊद शकील, मोहम्मद नवाज, शाहीन अफरीदी, नसीम शाह, हारिस रऊफ.