बनावट अंड्याच्या आतील पिवळा पदार्थ तव्यावर टाकल्यास तो तसाच राहतो...साधारण अंड्यांच्या पिवळ्या पदार्थासारखा तव्यावर पसरत नाही. अंड्यांमधील ही हानीकारक रसायनं तुमच्या जीवाला धोकादायक ठरू शकतात. अंडी आपल्या जेवणाच सर्रास वापरली जातात. त्यामुळं चुकून अशी प्लास्टिकची अंडी आपल्या पोटात गेली तर मोठी किंमत मोजावी लागू शकते.
2/5
कोलकाता आणि चेन्नईच्या पाठोपाठ आता डोंबिवलीतही प्लास्टिकची अंडी सापडली आहेत.
3/5
प्लास्टिकची अंडी उकळल्यानंतर अंड्यांचा बाहेरचा भाग तोडल्यास कडक होतो. नेहमीच्या अंड्यांपेक्षा बनावट अंड्यांच्या आतील पिवळा भागाचा रंग अधिक गडद असतो
4/5
गेल्या काही दिवसांपासून प्लास्टिकच्या अंडीचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे अंडी खरेदी करताना जरा सावधानता बाळगा.
5/5
प्लास्टिक अंड्यांच्या आतला पिवळा भाग हा जिलेटीन, अॅल्यूमिनीयम, कॅल्शियम, सोडिअम एल्गिनाईटसाऱख्या रसायनांनी बनलेला असतो. याच रसायनांनी अंड्यांचा बाहेरील भाग बनवला जात असल्याचीही शक्यता आहे.