एक्स्प्लोर
क्रिकेटविश्वात मोठी उलटफेर; दक्षिण अफ्रिकेला लोळवत अफगाणिस्तानने पुन्हा इतिहास रचला
Afghanistan vs South Africa: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 177 धावांनी विजय मिळवत अफगाणिस्तानने मालिका जिंकली आहे.

Afghanistan vs South Africa
1/8

अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना शारजाह क्रिकेट मैदानावर खेळला गेला. या सामन्यात विजय मिळत अफगाणिस्तानने आणखी एक इतिहास रचला आहे.
2/8

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 177 धावांनी विजय मिळवत अफगाणिस्तानने मालिका जिंकली आहे. अफगाणिस्तानचा एकदिवसीय क्रिकेटमधील आफ्रिकन संघाविरुद्धचा हा पहिला विजय ठरला.
3/8

पहिल्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा 6 विकेट्सने पराभव केला होता.
4/8

अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 312 धावांचं आव्हान दिलं होतं. अफगाणिस्तानने 50 षटकांमध्ये 4 विकेट्स गमावून 311 धावा केल्या.
5/8

अफगाणिस्तानकडून रहमानुल्लाह गुरुबाज , अझमतुल्लाह ओमरझई आणि रहमत शाह या तिघांनी सर्वाधिक धावा केल्या. तर इतरांनी छोटेखानी खेळी करत अफगाणिस्तानला 300 पार पोहचवण्यात योगदान दिलं.
6/8

अफगाणिस्तानकडून रहमानुल्लाह गुरुबाज रहमानुल्लाह गुरुबाज याने शतकी खेळी केली. रहमानुल्लाहने 110 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 105 धावा केल्या. रियाझ हसन याने 45 बॉलमध्ये 29 रन्स केल्या.
7/8

राशिद खानने 9 षटकात केवळ 19 धावा देत 5 विकेट्स पटकावल्या. राशिदने टोनी डी जोर्गी, एडन मार्कराम, ट्रिस्टन स्टब्स, कील व्हेरिन आणि विआन मुल्डर यांना बाद केले. नांगेलिया खरोटेनेही 4 विकेट्स घेतल्या. तर अजमतुल्ला उमरझाईला एक विकेट घेण्यात यश मिळाले.
8/8

312 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 34.2 षटकात अवघ्या 134 धावांत सर्वबाद झाला आणि 177 धावांनी सामना गमावला. कर्णधार टेंबा बावुमाने सर्वाधिक 38 धावा केल्या.
Published at : 21 Sep 2024 08:45 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
