एक्स्प्लोर
बॉलिवुड, हॉलिवुड आणि टॉलिवुड... यामधील 'वुड'चा अर्थ काय?
History of Hollywood, Bollywood : बॉलिवुड (Bollywood), हॉलिवुड (Hollywood) आणि टॉलिवुड (Tollywood) या शब्दांमध्ये 'वुड' हा शब्द समान आहे.

How Did Bollywood Hollywood Get its Name
1/10

हिंदी चित्रपटसृष्टी 'बॉलिवुड' (Bollywood) या नावाने, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी 'टॉलिवुड' (Tollywood) या नावाने आणि अमेरिकन फिल्म इंडस्ट्री 'हॉलिवूड' (Hollywood) नावाने ओळखली जाते.
2/10

पण तुम्ही कधी विचार केला आहे की, चित्रपटसृष्टीला नावे कशी मिळाली आणि यातील 'वुड' शब्दाचा अर्थ नक्की काय आहे?
3/10

रिअल इस्टेट व्यावसायिक एच.जे. व्हिटली (H.J. Whitley) यांना हॉलिवूडचे पिता (Father of Hollywood) म्हटले जाते. त्यांनीच अमेरिकेच्या चित्रपटसृष्टीला 'हॉलिवूड' हे नाव दिले.
4/10

व्हिटली यांनी 'हॉलीवूड' हे ठिकाणाचे नाव तेथील चित्रपटसृष्टीला दिले. कालांतराने इथल्या चित्रपटांना इतर देशांमध्ये प्रसिद्धी मिळाली आणि हॉलिवूडचं नाव जगभरात गाजलं. हॉलिवूडमध्ये आजही अनेक ऐतिहासिक स्टुडिओ आहेत.
5/10

1930 पर्यंत अमेरिकन चित्रपटसृष्टी म्हणजेच 'हॉलिवूड'चे नाव जगभर प्रसिद्ध झाले होते. तोपर्यंत भारतातील चित्रपटसृष्टी फक्त हिंदी चित्रपट उद्योग या नावाने ओळखली जात होती.
6/10

बॉलीवुड हा शब्द हा 'बॉम्बे' या शब्दापासून आला आहे आणि त्याच्यापुढे हॉलीवुड शब्दामधील वुड हा शब्द वापरण्यात आला आहे. अशा प्रकारे हिंदी चित्रपटांसाठी बॉली आणि वूड असा मिळून बॉलिवुड शब्द प्रचलित झाला.
7/10

त्याकाळात मुंबईला बॉम्बे नावाने प्रसिद्ध होती आणि इथे चित्रपट बनायचे, म्हणून बॉलीवूडमध्ये 'ब' अक्षराला प्राधान्य देऊन बॉलिवुड हे नाव ठेवण्यात आले. जगभरात 70 च्या दशकापर्यंत बॉलिवुड हे नाव प्रसिद्ध झाले.
8/10

बॉलीवूड हे नाव मिळण्याचे श्रेय बंगाली चित्रपटांना द्यायला हवे, असेही म्हटले जाते. 1930 साली कोलकात्याचा बंगाली चित्रपट उद्योग 'टॉलीगंज' नावाच्या परिसरात होता.
9/10

ज्युनियर स्टेट्समन नावाच्या मासिकाने पहिल्यांदाच याबद्दल लिहिताना 'टॉलिवूड' हा शब्द वापरला. पण, आजच्या काळात दाक्षिणात्य चित्रपटांसाठी टॉलिवूड हा शब्द वापरला जातो.
10/10

जागतिक स्तरावर भारतीय चित्रपटांना बॉलिवुड म्हटले जाते पण हे नाव अधिकृत नाही. 'बॉलिवूड' हा शब्द संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीसाठी नसून फक्त मुंबईतील चित्रपटसृष्टीसाठी आहे. पण बॉलिवुड हे नाव आता जगभरात लोकप्रिय झाले आहे.
Published at : 06 Jan 2023 11:20 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
पुणे
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
