एक्स्प्लोर

Ajit Pawar: पीक कर्जमाफी होणार की नाही? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'पीक कर्जमाफी होणार...'

Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले अजित पवार यांनी पिककर्ज माफी होणार की नाही याबाबत आज स्पष्टपणे भाष्य केलं आहे.

बारामती: राज्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमार्फत शेती पीकासाठी कर्ज दिलं जातं. यामध्ये सर्वाधिक कर्ज वितरण जिल्हा सहकारी बँकेमार्फत होते. फेब्रुवारी महिन्यापासून शेतकरी कर्ज भरत असतात. मात्र, सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, असे आश्वासन विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने दिलं होतं. त्यामुळे पुन्हा सत्तेत आलेलं महायुती सरकार कर्जमाफी करेल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कर्ज भरण्यास आखडता हात घेतला आहे. दरम्यान  राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले अजित पवार (Ajit Pawar) यांनी पिककर्ज माफी होणार की नाही याबाबत आज स्पष्टपणे भाष्य केलं आहे. 

बारामतीमध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, विधानसभा निवडणुकीत काही गोष्टी घडल्या होत्या. आर्थिक शिस्त गरजेची असते. त्याप्रमाणे मी अर्थसंकल्प सादर केला. विरोधकांनी जी टीका करायची ती केली. आम्ही वास्तववादी भूमिका घेऊन अर्थसंकल्प सादर केला. मी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतो, मला थोडीशी तरी अक्कल आहे. सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग करता येत नाही. काहींनी निवडणुकीच्या आधी कर्जमाफी बाबत वक्तव्य केले होते. मी राज्यातल्या जनतेला सांगतो 31 तारखेच्या आत कर्जमाफीचे पैसे भरा. जे आधी सांगितलं होतं, ते प्रत्यक्षात येत नाही.आता तशी परिस्थिती नाही भविष्यातील परिस्थिती बघून आम्ही निर्णय घेऊ. या वर्षी आणि पुढच्या वर्षीची पीक कर्जमाफी होणार नाही, तशी आपली परिस्थिती नाही, असं स्पष्टपणे अजित पवारांनी (Ajit Pawar) म्हटलं आहे. 

सर्व धर्माचे लोक एकत्र राहण्याची ही आपली परंपरा

पुढे  पुतळ्याच्या अनावरणाबाबत बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, सर्व धर्माचे लोक एकत्र राहण्याची ही आपली परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवण आपल्याला दिली आहे. त्या शिकवणी मधून आपण पुढे जात आहोत. 1984 साली या पुतळ्याच्या अनावरासाठी राष्ट्रपती, त्यावेळेसचे मुख्यमंत्री आणि शरद पवार उपस्थित होते. काही महिन्यांपुर्वी पंतप्रधानांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झालं. त्याला मी होतो, देवेंद्र फडणवीस होते, एकनाथ शिंदे होते त्यामध्ये काही चुका झाल्या आणि वाऱ्याच्या वेगाने नको ती घटना घडली. त्याचे शल्य सगळ्यांना आहे. समुद्राची हवा लोखंडाला बाद करून टाकते त्यामुळे तो प्रकार घडला. आता पुन्हा एकदा आम्ही त्याचं काम सुरू केले आहे. ते अंतिम टप्प्यात आहे, स्टेनलेस स्टील हे मटेरियल तिथे वापरलं. छत्रपती शिवाजी, महाराज संभाजी महाराज आपले दैवत आहेत. त्यांची देखभाल करणे गरजेचे आहे, जी खबरदारी घ्यायला पाहिजे होती, ती खबरदारी आपण घेतली. त्यामुळेच आज माळेगाव येथे पुतळ्याचं अनावरण केलं. निजामाचे राज्य होतं, आदिलशाहीचं राज्य होतं, पेशव्यांचे राज्य होतं, परंतु शिवाजी महाराजांचा आडनाव भोसले होते त्यांचे राज्य कधी नव्हतं ते रयतेचे राज्य असे म्हणायचे, असंही पुढे अजित पवारांनी म्हटलं आहे. 

अजितदादांनी थेट संचालकांना ढकललं मागं अन्...

बारामती तालुक्यातील माळेगांव सहकारी साखर कारखाना परिसरातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज या नूतनीकरण करण्यात आलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला. यावेळी कोनशिलेजवळ संचालकांनी मोठी गर्दी केली होती.कोनशिलेजवळ फोटो काढत असताना संचालकांची गर्दी पाहून अजित पवारांनी संचालकांना मागे सारले.अजित पवार पुढे आले आणि संचालकांना मागे ढकलले.यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकल्याचे पाहायला मिळाले.अजित पवार हे आपल्या खास शैलीसाठी ओळखले जातात. अजित पवार हे नेहमीच रोखठोक आणि स्पष्ट बोलत असतात. आता अजित पवारांच्या या मिश्कील कृत्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
Patanjali : समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
Embed widget