एक्स्प्लोर
Chiplun Ratnagiri News : चिपळूण तालुक्यातील कुंभार्लीत आई महाकाली देवीचा यात्रोत्सवाला उत्सवात सुरुवात
मानकऱ्यांनी विडे मांडल्यानंतर लाट फिरणाऱ्या मानकऱ्याला घेऊन मंदिरात ढोल-ताश्यांच्या गजरात धूपारती हातात घेउन पाच प्रदक्षिणा मारल्या जातात.

Feature Photo
1/10

विविध परंपरेने नटलेले कोकण... कोकणात पारंपारिक रिती, परंपरा आजवरही कोकणकरांनी जपून ठेवल्या आहेत.
2/10

कोकणातील गावागावांतील ग्रामदैवताचा साजरा होणारा यात्रोत्सव लोकप्रिय आहे.
3/10

कोकणात यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. त्यातीलच एक म्हणजे चिपळूण तालुक्यातील कुंभार्ली येथील आई महाकालीचा यात्रोत्सव...
4/10

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून या ग्रामदैवतेच्या यात्रोत्सवाकडे पाहिले जाते.
5/10

महाराष्ट्रात देवालयांचा विचार केलास थोड्या अंतरावर ग्रामदैवता म्हणजे शक्तीदेवतांचा वास दिसून येतो आणि त्यांच्या समोर भाविक नतमस्तक होतो.
6/10

कुंभार्ली येथील शिरगाव, कुंभार्ली, पोपळी या तीन गावचे श्री सुखाही, वरदायिनी, महाकाली देवस्थान. हाकेला धावणारी व नवसाला पावणारी आई असे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.
7/10

महाशिवरात्रीपासून यात्रोत्सवाला सुरुवात होते.
8/10

शिरगांव, कुंभार्ली, पोफळी या तीन गावातील मानकरी मंदिराच्या चौथाऱ्यात बसून या उत्सवाचे नियोजन करतात.
9/10

या यात्रेचे विशेष म्हणजे मंदिरासमोर असलेल्या मोकळ्या परीसरात एका उंच, सरळ लांब लचक खांबावर (बगाडावर) आडवी फिरणारी लाट...
10/10

ही लाट फिरण्याअगोदर मंदिराच्या चौथाऱ्यात तीन गावातील मानकरी बसून पानाचे विडे मांडतात त्यानंतर त्याची विधीवत पूजा केली जाते.
Published at : 22 Feb 2023 03:22 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
विश्व
नागपूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion