एक्स्प्लोर

Pune Crime News: शाळेत जाताना खाऊ देण्यासाठी बोलावलं अन्...; चौथीत शिकणार्‍या मुलीवर 27 वर्षाच्या नराधमाने केला अत्याचार, पुण्यातील घटनेनं संताप

Pune Crime News: खाऊच्या आमिषाने नराधमाने चौथीच्या विद्यार्थ्यानीसोबत घृणास्पद कृत्य केलं आहे. पुण्याजवळील वाघोलीत सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.

पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. स्वारगेट परिसरामध्ये बसमध्ये एका 26 वर्षीय तरूणीवरती अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती, त्यानंतर आता आणखी एका घटनेनं पुणे शहर हादरलं आहे. शाळेत जाण्यासाठी निघालेल्या चौथीतील मुलीवर 27 वर्षांच्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुण्यातील वाघोली परिसरात घडली आहे. या प्रकरणातील आरोपीला वाघोली पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे वाघोली परिसरात खळबळ उडाली आहे. खाऊच्या आमिषाने नराधमाने चौथीच्या विद्यार्थ्यानीसोबत घृणास्पद कृत्य केलं आहे. पुण्याजवळील वाघोलीत सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. 

पोलिसांनी या प्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता चौथीमध्ये शिक्षण घेणारी मुलगी सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घरातून शाळेत जाण्यासाठी निघाली होती. शाळेत जाण्याच्या रस्त्यावर एक पिठाची गिरण आहे, त्या पिठाच्या गिरणीत कामाला असलेल्या 27 वर्षीय आरोपीने तिला अडवलं आणि तुला खाऊ देतो असं आमिष दाखवत आरोपीने पीडित मुलीला पिठाच्या गिरणीत घेऊन गेला आणि त्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

काही वेळात गिरणीपासून काही अंतरावर पीडित मुलगी रडत होती. ते रस्त्यावरून जाणार्‍या येणार्‍या नागरिकांनी पाहिलं. त्यावेळी काही नागरिकांनी मुलीकडे विचारपूस केल्यावर तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर नागरिकांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास वाघोली पोलिस करत आहेत. 

मानलेल्या भावासह प्रियकराने केला अत्याचार

बार्शी तालुक्यामध्ये मानलेल्या बहिणीवरती भावासह तिच्या प्रियकराने अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मानलेल्या भावाने व प्रियकराने मिळून 34 वर्षीय विवाहित महिलेला कारमधून कुडूवाडी रस्त्यावरील लॉजवर नेऊन तेथे तिला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावरती सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे भाऊ बहिणीच्या नात्याला काळिमा फासण्याचा प्रकार बार्शी तालुक्यात घडला. या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे. सुरेश परसु माळी व संतोष भास्कर भानवसे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या दोघांनाही अटक करून बार्शी न्यायालयात हजर करण्यात आले, त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत पिडीत 34 वर्षीय पिडितेने तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे. 

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इंडिया आघाडीनं अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा लावून धरावा, राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, रोहित पवारांची मागणी
इंडिया आघाडीनं अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा लावून धरावा, राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, रोहित पवारांची मागणी
Maharashtra Budget 2026: मेट्रो ते रस्त्याचे सहा पदरीकरण... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पात पुणे शहरासाठी कोणत्या महत्त्वाच्या घोषणा केल्या?
मेट्रो ते रस्त्याचे सहा पदरीकरण... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पात पुणे शहरासाठी कोणत्या महत्त्वाच्या घोषणा केल्या?
Maharashtra Budget 2026: अजितदादांच्या विमान अपघातानंतर बारामती विमानतळाबाबत मोठी घोषणा; देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पातून A टू Z सांगितलं!
अजितदादांच्या विमान अपघातानंतर बारामती विमानतळाबाबत मोठी घोषणा; देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पातून A टू Z सांगितलं!
Nitin Gadkari: 'मैं डंडा लेके बैठा हूँ, मुझे मैनेज करने वाला पैदा नहीं हुआ', पेट्रोलियम लॉबीविरोधात नितीन गडकरींची जोरदार टोलेबाजी
'मैं डंडा लेके बैठा हूँ, मुझे मैनेज करने वाला पैदा नहीं हुआ', पेट्रोलियम लॉबीविरोधात नितीन गडकरींची जोरदार टोलेबाजी

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
Embed widget