एक्स्प्लोर

Nagpur Violance Update : हिंसाचारातील आरोपी देशाचे नागरिक नाहीत का? बुलडोझर कारवाईवर कोर्टाची तीव्र नाराजी; न्यायालयाने नेमकं काय म्हटलं?

उपराजधानीमधील हिंसाचाराचा कथित सूत्रधार फहीम, खान शमीम खान व आरोपी अब्दुल हफीज शेख लाल यांच्या घरांवरील बुलडोझर कारवाई प्रथमदृष्ट्या अवैध आढळून आल्यामुळे नागपूर खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली.

Nagpur Violance Update : उपराजधानीमधील धार्मिक हिंसाचाराचा कथित सूत्रधार फहीम खान शमीम खान व आरोपी अब्दुल हफीज शेख लाल यांच्या घरांवरील बुलडोझर कारवाई प्रथमदृष्ट्या अवैध आढळून आल्यामुळे नागपूर खंडपीठाने सोमवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. या कारवाईला घेऊन न्यायालयाने  महापालिकेला कडक शब्दांत फटकारले आहे. हिंसाचारातील आरोपी देशाचे नागरिक नाहीत का? त्यांची घरे पाडताना कायद्याचे पालन करण्याची गरज नाही का? असे परखड प्रश्न न्यायालयाने राज्य सरकार व नागपूर महानगर पालिकेला केले आहे.

बुलडोझर कारवाईला अंतरिम स्थगिती देत पालिका आयुक्तांना नोटीस बजावून कारवाईवरील आक्षेपांवर 15 एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. बुलडोझर कारवाईविरुद्ध फहीम खानची आई जेहरुनिस्सा शमीम खान व अब्दुल हफीजचा मुलगा मो. अयाज अब्दुल हफीज शेख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. या प्रकरणाच्या सुनावणीत न्यायालयाने या बाबत निरीक्षण नोंदविले आहे.

बुलडोझर कारवाईवर नागपूर खंडपीठाने व्यक्त केली तीव्र नाराजी

दरम्यान, नागपूरच्या चिखलीमधील संजयबाग कॉलनीत फहीम खानचे घर न्यायालयाच्या स्थगितीपूर्वीच पाडण्याची कारवाई पालिकेने पूर्ण केली. तर महालमधील अब्दुल हफीजच्या घराचा काही भाग पाडण्यात आला. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई लगेच थांबविण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या 13 नोव्हेंबर 2024 रोजीच्या निर्णयाची राज्यात काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, असे नमूद करून मुख्य सचिवांना पुढच्या सुनावणीपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

..तर न्यायालयाची गरज नाही, आम्ही आमचे निर्णय घेऊ असे जाहीर करा- इम्तियाज जलील 

नागपूरमध्ये जे काही घडलं त्याची आम्ही निंदा केली आहे. जी काही हिंसा घडली त्याची देखील निंदा केली आहे. मात्र अलिकडे जे काही नागपूर मध्ये घडलं उत्तर प्रदेशचे बुलडोझर कल्चर जे काही योगी आदित्यनाथ यांनी आणले होते, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारले होते. हे सर्व घर तुम्ही बांधून द्या, असं उत्तरप्रदेश सरकारला सांगितलं होतं. आज तेच कल्चर भाजपने इथे आणलं आहे. जे नागपूरमध्ये पाहायला मिळालंय.

जे कुणी दंगलीत सहभागी होते त्यांच्यावर कारवाई करा, जो कुणी कायदा हातात घेत असेल त्यांच्यावर कारवाई करा. पण तुम्ही घर तोडणार त्या घरामध्ये कुणाची तरी आई राहते, त्याच्या आई-मुलांचा, बायकोचं काय दोष आहे? जर असाच कायदा चालणार असेल तर आम्ही महाराष्ट्र सरकारला सांगतो तुम्ही सर्व न्यायालयांना ताळे ठोका आणि आता आम्हाला न्यायालयाची गरज नसेल आम्ही आमचे निर्णय घेऊ, असे जाहीर करा. असे परखड मत एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलं आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Language Taxi And Rickshaw Licenses: मराठी बोलून, लिहून, वाचून दाखवा अन्यथा रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे लायसन्स रद्द...; 1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच!
मराठी बोलून, लिहून, वाचून दाखवा अन्यथा रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे लायसन्स रद्द...; 1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच!
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी आऊट झाला खरा, पण टीम इंडियातील जागा पक्की, बीसीसीआय आयर्लंड दौऱ्यासाठी निवड करणार?
वैभव सूर्यवंशी आऊट झाला खरा, पण टीम इंडियातील जागा पक्की, बीसीसीआय आयर्लंड दौऱ्यासाठी निवड करणार?
धक्कादायक! डेटिंग ॲपवरुन मैत्री, हॉटेलचं बिल पाहून तरुणी पळाली; तरुणाची पोलिसात धाव, मॅनेजरविरुद्ध तक्रार
धक्कादायक! डेटिंग ॲपवरुन मैत्री, हॉटेलचं बिल पाहून तरुणी पळाली; तरुणाची पोलिसात धाव, मॅनेजरविरुद्ध तक्रार
Nashik Crime News: पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं, अवघ्या दोन गुणांनी आलेल्या अपयशामुळे तरुणीनं आयुष्य संपवलं; नाशिकमधील दुर्दैवी घटना
पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं, अवघ्या दोन गुणांनी आलेल्या अपयशामुळे तरुणीनं आयुष्य संपवलं; नाशिकमधील दुर्दैवी घटना

व्हिडीओ

Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report
Iran Us And China : इराण-अमेरिका युद्धामुळे बेहाल पण चीन मालामाल Special Report
Palghar Crime : लव्ह, सेक्स आणि धोका... पालघरमधील धक्कादायक प्रकार
Ashok Kharat : अशोक खरातच्या दारावर ईडी, तपासाची 'साप' शिडी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! डेटिंग ॲपवरुन मैत्री, हॉटेलचं बिल पाहून तरुणी पळाली; तरुणाची पोलिसात धाव, मॅनेजरविरुद्ध तक्रार
धक्कादायक! डेटिंग ॲपवरुन मैत्री, हॉटेलचं बिल पाहून तरुणी पळाली; तरुणाची पोलिसात धाव, मॅनेजरविरुद्ध तक्रार
Nashik Crime News: पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं, अवघ्या दोन गुणांनी आलेल्या अपयशामुळे तरुणीनं आयुष्य संपवलं; नाशिकमधील दुर्दैवी घटना
पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं, अवघ्या दोन गुणांनी आलेल्या अपयशामुळे तरुणीनं आयुष्य संपवलं; नाशिकमधील दुर्दैवी घटना
Ashok Kharat Case Nashik Crime News: आता कोण सोडणार...अशोक खरातचे कारनामे ऐकून सासू पार्वती काय काय म्हणाली?
आता कोण सोडणार...अशोक खरातचे कारनामे ऐकून सासू पार्वती काय काय म्हणाली?
उन्हाळ्यात जपून, कुल्फीमध्ये चक्क वनस्पती तेल अन् भेसळ; अन्न व औषध विभागाची धाड, 1856 पॅकेट्स जप्त
उन्हाळ्यात जपून, कुल्फीमध्ये चक्क वनस्पती तेल अन् भेसळ; अन्न व औषध विभागाची धाड, 1856 पॅकेट्स जप्त
Kalyan Crime news: कल्याणमध्ये सासरच्या मंडळींकडून सून-मेहुण्यावर चाकू-दगडाने हल्ला, पोलीस ठाण्याबाहेरच राडा, कारण काय?
कल्याणमध्ये सासरच्या मंडळींकडून सून-मेहुण्यावर चाकू-दगडाने हल्ला, पोलीस ठाण्याबाहेरच राडा, कारण काय?
Gold rate Silver price: सोने-चांदीचा भाव वाढला, चांदी 11 हजारांनी महागली, एक तोळा सोन्याचा आजचा भाव?
सोने-चांदीचा भाव वाढला, चांदी 11 हजारांनी महागली, एक तोळा सोन्याचा आजचा भाव?
Pune Crime news: दौंड पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांची शेतकऱ्याला जमिनीवर पाडून मारहाण
दौंड पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांची शेतकऱ्याला जमिनीवर पाडून मारहाण
Raj Thackeray on Babasaheb Ambedkar Jayanti: 'जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश्य डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढण्यातून बाहेर येऊ तेव्हा...' बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला राज ठाकरेंची खास पोस्ट
'जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश्य डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढण्यातून बाहेर येऊ तेव्हा...' बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला राज ठाकरेंची खास पोस्ट
Embed widget