एक्स्प्लोर
Nanded News: 'गुलाब' बनला नांदेडच्या तीन हजार कुटुंबांचा आधार
Nanded News: फेब्रुवारी महिन्याची सुरुवात होताच युवकांना 'व्हॅलेंटाइन डे'चे (Valentine Day 2023) वेध लागतात आणि प्रेमाचा दिवस 'व्हॅलेंटाइन डे' आज आहे.

Nanded: 'गुलाब' बनला तीन हजार कुटुंबांचा आधार
1/11

प्रेम व्यक्त करण्यासाठी तरुण-तरुणी गुलाबाच्या (Rose) फुलांची निवड करतात.
2/11

तर प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याच गुलाबाच्या खरेदी-विक्रीतून नांदेडच्या (Nanded) बाजारात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.
3/11

प्रेमाची उलगड करणारा हाच गुलाब जिल्ह्यातील सुमारे तीन हजार कुटुंबांच्या रोजीरोटीचा आधारही बनलाय.
4/11

नांदेड शहरातील हिंगोली गेट भागात दररोज सकाळी फुलांचे मार्केट भरताना पाहायला मिळते.
5/11

सकाळी 6 वाजल्यापासून या भागात गुलाब, जास्वंद, मोगरा, अशा विविध फुलांचा सुगंध दरवळतो.
6/11

या बाजारपेठेत मोठया फुलांची आवक होऊन या फुलांबरोबरच गुलाबाची खरेदी विक्रीची मोठी उलाढाल होते.
7/11

विशेष म्हणजे इतर फुलांच्या तुलनेत गुलाबांची खरेदी-विक्री जोरात असते.
8/11

दररोज जवळपास 20 क्विंटल गुलाबांची या बाजारपेठेत विक्री होते.
9/11

सरासरी 150 ते 200 रुपये किलो भाव मिळतो, ज्यातून दिवसभरात 4 लाखांची उलाढाल होते.
10/11

या बाजारपेठेत 12 होलसेल व्यापारी असून, 100 ते 150 किरकोळ व्यापारी आहेत.
11/11

यातून फुलशेती करणारे शेतकरी, व्यापारी, फुल विक्री, खरेदी बुके, हार तयार करणारे कारागीर अशा तीन हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह होतो.
Published at : 14 Feb 2023 03:49 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
Blog
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion