एक्स्प्लोर
Lalbaugcha Raja Visarjan 2024: लालबागचा राजा तराफ्यावर बसला; चहुबाजूंना जनसागर, बाप्पा निघाला गावाला
Lalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाला अखेरचा निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर भाविकांची गर्दी उसळली आहे.

Lalbaugcha RAJA
1/9

गेल्या दहा दिवसांपासून असंख्य गणेशभक्तांनी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती. अखेरच्या दिवशीदेखील लालबागचा राजाला निरोप देण्यासाठी देखील गर्दी उसळली.
2/9

ढोलताशांचा दणादणाट... फटाक्यांची आतषबाजी...गुलालाची उधळण आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... चा जयघोष करत राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला.
3/9

गिरगाव चौपाटीवर दाखल झाल्यानंतर राजाची आरती झाली.
4/9

लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या बोटींनी विशेष सलामी दिली.
5/9

लालबागच्या राजाला दरवर्षीप्रमाणे यंदाही तराफ्यावरुन खोल समुद्रात नेण्यात आलं. खास लालबागच्या राजासाठी हा तराफा बनवण्यात आला आहे.
6/9

लालबागचा राजा ज्या तराफ्यावर होता. तो तराफा हळूहळू पाण्याच्या आत गेला
7/9

चौपाटीपासून काही अंतरावर आत अरबी समुंद्रात गेल्यावर राजाचं विसर्जन होणार आहे.
8/9

हायड्रॉलिक्सचा वापर करत विसर्जन करण्यात येणार आहे.
9/9

विसर्जन तराफ्यावर पाच स्कुबा डायव्हर्स आहे.
Published at : 18 Sep 2024 09:40 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
