एक्स्प्लोर
मुख्यमंत्र्यांची भेट होत नाही तोपर्यंत मैदान सोडणार नाही; सावित्रीबाईंचा मुखवटा घालून अंगणवाडी सेविकांचं धरणं आंदोलन
Anganwadi Sevika Protest at Azad Maidan: महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघानं आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं.

Anganwadi Sevika Protest at Azad Maidan
1/8

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघानं आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं.
2/8

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघानं सावित्रीबाई फुले यांचा मुखवटा घालून आपल्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदान येथे धरणं आंदोलन केलं.
3/8

आपल्या मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी अंगणवाडी सेविका शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायची आहे.
4/8

जोपर्यंत एकनाथ शिंदे यांची भेट होत नाही, तोपर्यंत अंगणवाडी सेविका आझाद मैदान सोडणार नाहीत, असा पवित्रा आंदोलक महिलांनी घेतला आहे
5/8

राज्यभरातून या अंगणवाडी सेविका आझाद मैदानावर एकत्र आल्या आहेत.
6/8

शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि वेतन द्यावं, अर्ध्या पगारा ऐवजी दरमहा पेन्शन मिळालीच पाहिजे, नवा कार्यक्षम मोबाईल आणि राजभाषेत पोषण ट्रॅक ॲप द्यावं, बालकांच्या पूरक पोषण आहारामध्ये दुपटीनं वाढ करून चांगल्या प्रतीचा आहार द्यावा, या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघानं आंदोलन पुकारलं आहे.
7/8

त्यासोबतच, सेवानिवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्वरित एकरकमी लाभ द्यावा, सुसज्ज अंगणवाडी केंद्र बांधून द्यावं, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भराव्यात, तसेच, मिनी अंगणवाडी आणि अंगणवाडी सेविका यांना समान मानधन आणि समान सेवा शर्ती द्याव्यात, अशा मागण्यांसाठी आंदोलन पुकारलं आहे.
8/8

(सर्व फोटो : वेदांत नेब, एबीपी माझा प्रतिनिधी)
Published at : 03 Jan 2023 01:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
व्यापार-उद्योग
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
