एक्स्प्लोर

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी कलंकित अधिकाऱ्यांची पीए आणि ओएसडीपदी नेमणूक रोखली, म्हणाले, 'फिक्सरांना मान्यता देणार नाही'

Maharashtra PA and OSD: प्रशासकीय वर्तुळातील कलंकित अधिकाऱ्यांना मंत्र्यांचे पीए आणि ओएसडी म्हणून नेमू देणार नाही, अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.

नागपूर: महायुती सरकारमध्ये ओएसडी आणि स्वीय सहाय्यक (पीए) नेमण्याच्या मुद्द्यावरुन अजूनही वाद सुरु आहे. अनेक मंत्र्यांना त्यांनी शिफारस केलेले ओएसडी किंवा पीए मिळालेले नाहीत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सोमवारी नागपूरमध्ये महत्त्वपूर्ण वक्तव्य केले. मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक (PA) आणि विशेष कार्यासीन अधिकारी (OSD) म्हणून मी 109 नावांना मंजुरी दिली आहे. कॅबिनेट मंत्र्यांकडून या पदांसाठी एकूण 125 नावे पाठवण्यात आली होती. त्यापैकी 109 नावांना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, प्रशासकीय वर्तुळात 'फिक्सर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि ज्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरु आहे, त्यांच्या नावांना ओएसडी आणि पीए म्हणून मान्यता देण्यात आलेली नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

ओएसडी आणि पीए म्हणून नियुक्ती प्रलंबित असलेल्या 16 जणांमध्ये जे अधिकारी आहेत, त्यांची चौकशी सुरु आहे. प्रशासकीय वर्तुळात त्यांची ओळख फिक्सर अशी आहे. अशा फिक्सरांची नावे मी कदापि मंजूर करणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले. यावेळी फडणवीसांनी हवे असलेले पीए आणि ओएसडी मिळत नसल्याच्या मुद्द्यावरुन नाराजी व्यक्त करणाऱ्या माणिकराव कोकाटे यांनाही खडसावले. त्यांना कदाचित माहिती नसेल. पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो. यासंदर्भातील प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्याकडे पाठवतात, आणि अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतात. हे नव्याने होत नाही. कॅबिनेटच्या बैठकीत मी अगोदर सांगितलं होतं. तुम्हाला पाहिजे ते नाव पाठवा, मात्र ज्यांचे नाव फिक्सर म्हणून किंवा चुकीच्या कामात सहभागी असणाऱ्यांना मी मान्यता देणार नाही. कोणीही नाराज झाला तरी त्याला मान्यता देणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

पीए आणि ओएसडींनी काम न केल्यास नेमणूक रद्द होणार?

महायुती सरकारमधील मंत्र्यांकडे असणाऱ्या ज्या 109 पीए आणि ओएसडींची नेमणूक झाली आहे, तीदेखील पाच वर्षांसाठी कायम नसेल, अशी माहिती समोर आली आहे. पीए, पीएस आणि ओएसडी यांच्याविषयी काही तक्रारी आल्या आणि त्यात तथ्य आढळले तर त्यांना घरी बसावे लागू शकते, असे समजते. याशिवाय, काही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची नजर चुकवून मंत्रालयातील अन्य विभागातील आपल्या मर्जीतील कर्मचाऱ्यांना उसनवारी तत्त्वावर आपल्या सेवेत घेतले आहे. हे कर्मचारी त्यांना हवे असलेल्या मंत्र्याकडे काम करत असले तरी त्यांचा पगार मूळ विभागातून निघतो. या पद्धतीला उसनवार असे म्हणतात. ही पद्धत आता बंद केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आणखी वाचा

महायुतीतील कोल्ड वॉर आता विठ्ठलाच्या दारी, एकनाथ शिंदेंनी मंजूर केलेला प्रकल्प फडणवीस की अजितदादांनी रद्द केला?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हनीमूनच्या रात्री मुलगी अन् जावयासोबत आईदेखील एकाच खोलीत झोपते, 'या' देशातील विचित्र प्रथा
हनीमूनच्या रात्री मुलगी अन् जावयासोबत आईदेखील एकाच खोलीत झोपते, 'या' देशातील विचित्र प्रथा
कुणाल कामराने कुठेही एकनाथ शिंदेंचं नाव घेतलं नाही, आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले, CM फडणवीसांनाही प्रत्युत्तर
कुणाल कामराने कुठेही एकनाथ शिंदेंचं नाव घेतलं नाही, आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले, CM फडणवीसांनाही प्रत्युत्तर
Crime News : उत्तर प्रदेशातील खतरनाक गुन्हेगार, 50 हजारांचं इनाम; गुंड नाशिकमध्ये लपल्याची टीप मिळाली अन्...
उत्तर प्रदेशातील खतरनाक गुन्हेगार, 50 हजारांचं इनाम; गुंड नाशिकमध्ये लपल्याची टीप मिळाली अन्...
एवढ्या मिरच्या का लागल्या, प्रचंड चिडचिड होते का? प्रशांत कोरटकरला फोडायला हात का शिवशिवला नाही? सुषमा अंधारेंचा कुणाल कामराची काॅपी करत शिंदे गटावर प्रहार
Video : एवढ्या मिरच्या का लागल्या, प्रचंड चिडचिड होते का? प्रशांत कोरटकरला फोडायला हात का शिवशिवला नाही? सुषमा अंधारेंचा कुणाल कामराची काॅपी करत शिंदे गटावर प्रहार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 24 March 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सDevendra Fadnavis on Kunal Kamra : प्रसिद्धीसाठी सुपाऱ्या घेऊन बोलणाऱ्या लोकांना धडा शिकवावाच लागेलंABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 24 March 2025 दुपारी 01 च्या हेडलाईन्सWho is Kunal Kamra : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिप्पणी करणारा कुणाल कामरा कोण आहे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हनीमूनच्या रात्री मुलगी अन् जावयासोबत आईदेखील एकाच खोलीत झोपते, 'या' देशातील विचित्र प्रथा
हनीमूनच्या रात्री मुलगी अन् जावयासोबत आईदेखील एकाच खोलीत झोपते, 'या' देशातील विचित्र प्रथा
कुणाल कामराने कुठेही एकनाथ शिंदेंचं नाव घेतलं नाही, आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले, CM फडणवीसांनाही प्रत्युत्तर
कुणाल कामराने कुठेही एकनाथ शिंदेंचं नाव घेतलं नाही, आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले, CM फडणवीसांनाही प्रत्युत्तर
Crime News : उत्तर प्रदेशातील खतरनाक गुन्हेगार, 50 हजारांचं इनाम; गुंड नाशिकमध्ये लपल्याची टीप मिळाली अन्...
उत्तर प्रदेशातील खतरनाक गुन्हेगार, 50 हजारांचं इनाम; गुंड नाशिकमध्ये लपल्याची टीप मिळाली अन्...
एवढ्या मिरच्या का लागल्या, प्रचंड चिडचिड होते का? प्रशांत कोरटकरला फोडायला हात का शिवशिवला नाही? सुषमा अंधारेंचा कुणाल कामराची काॅपी करत शिंदे गटावर प्रहार
Video : एवढ्या मिरच्या का लागल्या, प्रचंड चिडचिड होते का? प्रशांत कोरटकरला फोडायला हात का शिवशिवला नाही? सुषमा अंधारेंचा कुणाल कामराची काॅपी करत शिंदे गटावर प्रहार
Siddharth Jadhav Wife Trupti Akkalwar: सिद्धार्थ जाधव रागात बायकोला म्हणाला, सगळे लोक तुला माझ्यामुळे ओळखतात; पत्नीने घेतला मोठा निर्णय अन् माहेरचं आडनाव...
सिद्धार्थ जाधव रागात बायकोला म्हणाला, सगळे लोक तुला माझ्यामुळे ओळखतात; पत्नीने घेतला मोठा निर्णय अन् माहेरचं आडनाव...
Satara Crime: थायलंडच्या बीचवर फुल मून पार्टी, समुद्रातील खडकावर 24 वर्षांच्या तरुणीवर अत्याचार, साताऱ्यातील 'ते' दोन नराधम कोण?
थायलंडच्या बीचवर जर्मन तरुणीच्या शरीराचे लचके तोडणारे साताऱ्यातील 'ते' दोन नराधम कोण? महत्त्वाची अपडेट
या '5' फळांना चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नका!
या '5' फळांना चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नका!
पोटाची खळगी भरण्यासाठी पोटचा गोळा दगडाला बांधून वेठबिगारी करतेय माय; काळीज हेलावणारा व्हिडिओ
पोटाची खळगी भरण्यासाठी पोटचा गोळा दगडाला बांधून वेठबिगारी करतेय माय; काळीज हेलावणारा व्हिडिओ
Embed widget