एक्स्प्लोर
रुख्मिणी मातेच्या पालखीचं अमरावतीत भव्य स्वागत
अमरावती : कौंडण्यपूर येथून पंढरपूरकडे आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्याकरिता जाणाऱ्या माता रुख्मिणीच्या पायदळ पालखीचे अमरावतीत स्वागत करण्यात आलं.

Rukhmini Mata Palakhi grand welcome in Amravati Ashadhi Ekadashi 2024
1/10

अमरावतीच्या अंबानगरीत बियाणी चौकात रुख्मिणी मातेच्या पालखीचं आमदार यशोमती ठाकूर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं.
2/10

दरवर्षीप्रमाणे या मंगलमय सोहळ्याकरिता सर्वच धर्मातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
3/10

त्यामुळे हा स्वागत सोहळा सामाजिक समतेचा वारसा जपणारा ठरला.
4/10

यावेळी नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी फुगडीचा फेर धरला.
5/10

श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील रुख्मिणी मातेची पालखी श्रीक्षेत्र पंढरपुर येथे होणाऱ्या आषाढी सोहळ्याकरिता जाण्याची 430 वर्षाची परंपरा आहे.
6/10

पालखी कौंडण्यपूर येथून निघाल्यानंतर अमरावती शहरात आगमन होताच अमरावती शहरातील बियाणी चौकात या पालखीचे स्वागत करण्याची परंपरा आमदार यशोमती ठाकूर यांनी सुरु केली.
7/10

त्यानुसारच या पालखीचे उत्स्फूर्त अन् जंगी स्वागत करण्यात आले.
8/10

पालखीचे बियाणी चौकात आगमन होताच पालखी पदयात्रेत सहभागी झालेल्या सर्व वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले.
9/10

यावेळी भक्तीत तल्लीन झालेल्या वारकऱ्यांसोबत आमदार यशोमती ठाकूर यांनी फुगडीचा फेर धरला.
10/10

त्यानंतर आमदार यशोमती ठाकूर यांनी काही अंतरापर्यंत पालखी खांद्यावर घेतली अन् त्यानंतर वारकऱ्यांचा पुढचा प्रवास सुरु झाला.
Published at : 14 Jun 2024 09:35 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रायगड
अहमदनगर
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
