एक्स्प्लोर
विधान भवनाच्या पायऱ्यांवर सुरेश धस, जयंत पाटील अन् जितेंद्र आव्हाडांमध्ये खलबतं; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Maharashtra Budget Session 2025 : विधान भवनाच्या पाय-यावर भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड चर्चा करत असल्याचे बघायला मिळाले आहे.
Maharashtra Budget Session 2025
1/7

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Budget Session 2025) कालपासून (3 मार्च) सुरुवात झाली आहे.
2/7

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात असलेल्या महायुती सरकरचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. तर अर्थमंत्री म्हणून अजित पवार (Ajit Pawar) अर्थसंकल्प कसा मांडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
3/7

दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या (Santosh Deshmukh Death Case) करताना केलेल्या अमानुष अत्याचाराचे फोटो सोमवारी रात्री समोर आलेत. यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळत आहे.
4/7

तर आज राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राजीनामा दिलाया.
5/7

या सर्व मुद्यांवरुन राज्याचे राजकारण तापले असताना आज ( 4 मार्च) विधान भवनाच्या पाय-यावर भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड चर्चा करत असल्याचे बघायला मिळाले आहे.
6/7

भर उन्हात तीन ही नेते एकत्र बसुन गप्पा करत असल्याने अनेकांच्या नजरा त्याच्याकडे लागल्या असल्याचे ही बघायला मिळाले.
7/7

दरम्यान, बीड प्रकरण आणि धनंजय मुंडे यांच्या संदर्भात ही चर्चा सुरु असल्याची माहिती पुढे आली असून अनेक चर्चा या निमित्याने आता रंगू लागल्या आहेत.
Published at : 04 Mar 2025 05:40 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























