Zero Hour Mahapalika Mahamudde Nashik : नाशिक मनपाला नियोजनाची अॅलर्जी, महापालिकेचे महामुद्दे काय?
Zero Hour Mahapalika Mahamudde Nashik : नाशिक मनपाला नियोजनाची अॅलर्जी, महापालिकेचे महामुद्दे काय?
नाशिक शहरात एकूण ७५ वाहतूक बेटं आहेत त्यातील अनेक ठिकाणी त्यांची गरजच नाहीये ही बेटं CSR फंडातून उभारण्यात आली असली तरी त्याचं लोकेशन महापालिकेनं ठरवणं अपेक्षित आहे मात्र अनेक ठिकाणी CSR फंड देणाऱ्या कंपन्यांनीच लोकेशन ठरवलं आणि वाहतूक बेटं उभारून मोकळे झाले काही ठिकाणी सिग्नल अत्यावश्यक आहे, मात्र केवळ वाहतूक बेटांवर नागरिकांची बोळवण करण्यात आलीये अनेक चौकांमध्ये तर ना वाहतूक बेटं आहेत ना सिग्नल यामुळे अनेक गंभीर अपघात घडतात, त्याची जबाबदारी महापालिका घेणार का? आपल्याकडे लोक किती बेशिस्तपणे वाहनं चालवतात हे माहीत असूनही महापालिकेला याचं गांभीर्य का नाही, असा सवाल नागरिक विचारतायेत रीतसर नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणी याची महापालिकेचा अॅलर्जी आहे का? असा प्रश्न अनेक वाहतूक तज्ज्ञांनी विचारला आहे आता जाऊयात त्रंबक रोडवर. तिथे एका चौकातलं वाहतूक बेट खूपच मोठंय. त्याचा आकार कमी केला पाहिजे, तसंच सिग्नल बसवले पाहिजेत. काही नागरिक तर उड्डाणपुलाची देखील मागणी करतायेत. पण तसं काहीही झालेलं नाही. नाशिक वाहतूक पोलिसांनी महापालिकेक़डे एकूण २७ ठिकाणी ट्रॅफिक सिग्नलची मागणी केलीये. मात्र त्यावर अजूनही निर्णय झालेला नाही. येत्या दोन वर्षांत सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे, तेव्हा पोलीस यंत्रणेवर मोठा ताण येणारे. त्या अनुषंगानं, आताच जर सगळीकडे सिग्नल बसवले तर ऐन कुंभमेळ्यात घाई होणार नाही. मात्र आपल्या महापालिकांचा कारभार इतका झटपट असता तर अजून काय हवं होतं?
All Shows

































