चोरी करणारे गद्दारच, कुणाल कामराने सत्यात्मक गाणं केलं, त्या जनभावना आहेत, उद्धव ठाकरेंनी केलं समर्थन
स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबाबत विडंबनात्मक टिप्पणी केलीय. यावर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

Uddhav Thackeray : स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराने (Stand-up comedian Kunal Kamra) एका कार्यक्रमादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबाबत विडंबनात्मक टिप्पणी केली आहे. यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील खार परिसरातील हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड केली आहे. या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुणाल कामराने सत्यात्मक गाणं केलं असल्याचे ठाकरे म्हणाले. आम्ही आज पण बोलतोय, चोरी करणारे गद्दार आहेत. शिवसैनिकांनी ती तोडफोड केली नाही तर गद्दार सेनेच्या एसएनसीच्या लोकांनी केली असेल असंही ठाकरे म्हणाले.
कुणाल कामरांनी जनभावना व्यक्त केल्या
भेकड लोकांनी आपल्या नेत्याचा अपमान झाला म्हणून तोडफोड केल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. कामरांनी जनभावना व्यक्त केल्या आहेत. जागेचं नुकसान केलं ते भरुन दिलं पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य गद्दारींसाठी कसं काय? पोलीसांचा दरारा कमी करण्यासाठी सुरु आहे मुख्यमंत्र्यांचे काही चालत नाही असेही ठाकरे म्हणाले. राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर यांच्यावर कारवाई का झाली नाही असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी केला. मुंबईतील खार परिसरातील हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी सुमारे 40 शिवसैनिंकावरही गुन्हा दाखल केला आहे.
अक्षय शिंदे प्रकरणावरही भाष्य
पाशवी बहूमत मिळत असते तेव्हा पाशवी बलात्कार होत असतात. तस आपल्यावर बलात्कार होत आहे. विरोधी पक्षाला काही किंमत द्यायची नाही म्हणून समोर कोण बसत नाही. अक्षय शिंदे यावर गोळीबार केला. त्याच्या हातात हातकड्या असताना त्यांनी पिस्तुल कशी घेण्याचा प्रयत्न केला. पीएसआय अधिकारी आतमध्ये बसतो. जर असे इन्काऊंटर करत असतील तर न्यायपालिका काय कामाची असेही ठाकरे म्हणाले.
औरंगजेबच्या थडग्याची सुपारी कोणी दिली होती
अजित पवार यांचे धन्यवाद मानतो. कारण आजूबाजूच्या लोकांना आवरलं पाहिजे. नागपूरची सुपारी कोणी दिली होती. औरंगजेबच्या थडग्याची सुपारी कोणी दिली होती. अनाजी पंतांचा वारसा चालवायचा की संभाजी महाराजांचा? गृहमंत्री तुम्ही आहात ना? तरीही नागपुरात दंगा कसा होतो? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांना केला. कामराचे गाणे ऐकवा. सत्यमेव जयते खोडून टाका आणि गद्दामेव जयते करा असे म्हणत ठाकरेंनी नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
महत्वाच्या बातम्या:
एवढ्या मिरच्या का लागल्या, प्रचंड चिडचिड होते का? प्रशांत कोरटकरला फोडायला हात का शिवशिवला नाही? सुषमा अंधारेंचा कुणाल कामराची काॅपी करत शिंदे गटावर प्रहार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
