एक्स्प्लोर
Malegaon Namaj : और जमीन पर बारिश अताह फरमा... पावसासाठी मालेगावात नमाज पठण
चांगला पाऊस पडावा, सगळीकडे शेत शिवार फुलावे, नद्या, धरणे तुडूंब भरुन वाहावे यासाठी मालेगावात विशेष नमाज पठण करण्यात आलं.

Malegaon Namaz
1/11

ऑगस्ट महिना संपत आला तरी नाशिक जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही.
2/11

जिल्ह्यातील सिन्नर, येवला, नांदगाव, मालेगाव आदी भागात पावसाचे प्रमाण कमी असल्याने दुष्काळी परिस्थिती आहे.
3/11

अशातच पाऊस पडावा यासाठी मालेगावात विशेष नमाज पठण करत अल्लाहला साकडे घालण्यात आलं.
4/11

चांगला पाऊस पडावा, सगळीकडे शेत शिवार फुलावे, नद्या, धरणे तुडूंब भरुन वाहावे यासाठी नमाज पठण करण्यात आलं.
5/11

'या अल्लाह हमारे गुनाह को कबूल कर, हमारी गलतियो को माफ कर दे..और जमीन पर बारिश अताह फरमा..असे साकडे विशेष नमाज पठणात अल्लाहला घालण्यात आले.
6/11

पावसाला आळवणी करण्यासाठी 'जमितुल उलेमा' च्या वतीने या विशेष नमाज पठण आयोजित केले.
7/11

यामध्ये नाशिकच्या मालेगाव मध्यचे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी पावसासाठी विशेष दुवा पठण केले.
8/11

मालेगावच्या पोलीस कवायत मैदानावर आयोजित या नमाज पठणावेळी 50 हजाराहून अधिक मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
9/11

मालेगावमध्ये याआधीही 'ऑल इंडिया सुन्नी जमीअतुल इस्लाम' च्या वतीने विशेष दुवा पठण करुन पावसासाठी अल्लाहला साकडे घातले होते.
10/11

12 ऑगस्ट रोजी मुंशी शहा दर्गा येथे आयोजित कार्यक्रमात मुस्लिम बांधवांनी सहभाग घेत पावसासाठी विशेष दुवा पठण केले होते.
11/11

मौसम नदी काठावरील दर्गापर्यंत यावेळी मिरवणूकही काढण्यात आली होती.
Published at : 22 Aug 2023 12:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
रायगड
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
