एक्स्प्लोर
Advertisement

Independence Day 2021 : 15 ऑगस्टचे महत्व काय? हाच दिवस स्वातंत्र्यासाठी का निवडला?

Feature_Photo_8
1/7

भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वी आपण 26 जानेवारी हा दिवस प्रतिकात्मक स्वातंत्र्यदिवस म्हणून साजरा करत होतो. त्यामागे एक महत्वाचं कारण होतं. म्हणजे 26 जानेवारी 1929 साली राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनामध्ये 'पूर्ण स्वराज्या'ची मागणी करण्यात आली होती. (photos by getty images)
2/7

माऊंटबॅटन यांनी 3 जून 1947 साली भारतीय स्वातंत्र्यासाठी एक योजना मांडली. त्याला '3 June Plan' किंवा 'माऊंटबॅटन प्लॅन' या नावानेही ओळखलं जातं. माऊंटबॅटन यांनी भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी 15 ऑगस्ट 1947 ही तारीख निश्चित केली. (photos by getty images)
3/7

पण देशभरातून यावर निराशा व्यक्त करण्यात येत होती. कारण भारतीय ज्योतिषशास्त्राप्रमाणे, 15 ऑगस्ट 1947 हा दिवस अशुभ होता. त्यामुळे या दिवशी स्वातंत्र्य नको असं सांगत त्याबद्दल इतरही तिथी सूचवण्यात आल्या. पण लॉर्ड माऊंटबॅटन हे 15 ऑगस्ट याच दिवसावर आग्रही होते. (photos by getty images)
4/7

लॉर्ड माऊंटबॅटन हे 15 ऑगस्ट या दिवसाला आपल्या कारकिर्दीसाठी शुभ मानायचे. महत्वाचं म्हणजे ब्रिटिशांसाठीही हा दिवस महत्वाचा होता. कारण दुसऱ्या महायुद्धामध्ये 15 ऑगस्ट 1945 या दिवशी जपानने ब्रिटिश आणि मित्र राष्ट्रांसमोर शरणागती पत्करली होती. (photos by getty images)
5/7

शास्त्रांच्या अनुसार 'अभिजीत मुहूर्त' हा असा अतिशय शुभ आणि फलदायी मुहूर्त मानला जातो. या 24 मिनीटांच्या मुहूर्तामध्ये शुभ कार्ये सिद्धीस नेली जातात. 14 ऑगस्टच्या रात्री 11 वाजून 51 मिनीटांपासून सुरु होणारा हा मुहूर्त 12 वाजून 15 मिनीटांपर्यंत, एकूण 24 मिनीटांचा होता. त्यामध्ये आणखी ज्योतिषशास्त्रांचा संदर्भ देऊन नेहरुंचे स्वांतत्र्याचे भाषण हे मध्यरात्री 12 वाजून 39 मिनीटांपर्यंत द्यायचं असं ठरवण्यात आलं.(photos by getty images)
6/7

ठरलेल्या तारखेप्रमाणे आणि वेळेप्रमाणे सगळं जग झोपेत असताना 15 ऑगस्टच्या पहिल्या ठोक्याला भारत स्वातंत्र्य झाला, तशी घोषणा तत्कालीन पंतप्रधान नेहरुंनी केली. (photos by getty images)
7/7

अशा पद्धतीने भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी 15 ऑगस्ट 1947 या खास दिवसाची निवड करण्यात आली. आता हा दिवस अब्जावधी भारतीयांसाठी खास झाला आहे. (photos by getty images)
Published at : 14 Aug 2021 04:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
