Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
क्रिकेटचे गुरू द्रोणाचर्य रमाकांत आचरेकर यांच्या 92 व्या जयंतीनिमित्त काल मुंबई क्रिकेटची पंढरी असलेल्या शिवाजी पार्क मैदान परिसरात आचरेकर सरांचं एक स्मारक उभारण्यात आलंय. गेट नंबर 5 जवळ उभारलेल्या या स्मारकाचं अनावरण आचरेकर सरांचा सर्वात आवडता शिष्य भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला विनोद कांबळी (Vinod Kambli) यांच्यासह आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचलेल्या आचरेकर सरांच्या माजी विद्यार्थ्यांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही विशेष उपस्थिती होती.आचरेकर सरांचं स्मारक उभारण्याची संकल्पना राज ठाकरे यांची होती. त्यामुळे इथं आचरेकर सरांचा पुतळा उभारण्याऐवजी क्रिकेटचं दर्शन घडवणारं एक अनोख स्मारक उभारण्यात आलंय. ज्यात दिग्गज क्रिकेटर्सची स्वाक्षरी असलेली बॅट, स्टम्प्स, ग्लोव्हज आणि आचरेकर सरांची ओळख असलेली त्यांची रोमिओ कॅप बसवण्यात आली आहे. सदर कार्यक्रमात सचिन तेंडुलकरसह विनोद कांबळींनी देखील आचरेकर सरांच्या आठवणी सांगितल्या. विनोद कांबळींनी आचरेकर सरांचं आवडतं गाणं...सर जो तेरा चकराये, या दिल डूबा जाये, आजा प्यारे पास हमारे...काहे घबराये, काहे घबराये, हे गाणं गायलं. यावेळी सर्वंच भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.