एक्स्प्लोर
Advertisement

Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरी स्वत:ला एक सामान्य मुलगी मानतात आणि त्यांना संत म्हणणे आवडत नाही. दोन लाखांची लेदर बॅग विमानतळावर त्यांच्या हाती दिसून आल्याने त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आले होते.

Who Is Jaya Kishori
1/11

कथाकार आणि भजन गायिका जया किशोरी यांना आज कोण ओळखत नाही? जया किशोरी अशा कथाकार आहेत, ज्यांना सर्व वयोगटातील लोक आवडतात.
2/11

जया किशोरी यांनी खास शैलीत भजन गाऊन आणि कथा कथन करून लोकांमध्ये एक खास ओळख निर्माण केली.
3/11

जया किशोरी यांची कीर्ती देश-विदेशात पसरली आहे. तुम्ही मोटिव्हेशनल स्पीकर जया किशोरी यांचे नाव देखील ऐकले असेल किंवा सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ पाहिले असतील.
4/11

जाणून घेऊया, जया किशोरी यांच्या जीवनाशी निगडीत रहस्ये आणि त्यांच्या चरित्राबद्दल. जया किशोरी यांचा जन्म 13 जुलै 1995 रोजी राजस्थानमधील सुजानगढ या एका लहानशा गावात झाला.
5/11

जया किशोरीच्या वडिलांचे नाव राधे श्याम हरितपाल आणि आईचे नाव गीता देवी हरितपाल आहे. जया किशोरीला चेतना शर्मा नावाची बहीण आहे.
6/11

जया किशोरींचे अजून लग्न झालेले नाही. जया किशोरीच्या शिक्षणाबद्दल सांगायचे तर त्यांनी बी.कॉम.चे शिक्षण घेतले आहे. यासोबतच त्यांना अध्यात्माचे ज्ञानही मिळाले आहे.
7/11

जया किशोरी यांना त्यांच्या कुटुंबातूनच आध्यात्मिक वातावरण मिळू लागले. जया किशोरी 6-7 वर्षांच्या असताना त्यांचा आध्यात्मिक प्रवास सुरू झाला.
8/11

वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी जया किशोरी यांनी लिंगाष्टकम, शिव तांडव स्तोत्रम्, मधुराष्टकम्रा, शिवपंचाक्षर स्तोत्रम्, दरिद्रय दहन शिव स्तोत्रम् यांसारखी अनेक स्तोत्रे आठवली आणि भजन आणि गीते गायला सुरुवात केली.
9/11

जया किशोरी यांचे खरे नाव जया शर्मा आहे. जया किशोरी यांच्या गुरूचे नाव गोविंद राम मिश्रा आहे. जया शर्मा यांना 'किशोरी' ही पदवी गुरुजींकडूनच मिळाली.
10/11

श्री कृष्णावरील गाढ श्रद्धा आणि प्रेमामुळे तिला किशोरी ही पदवी देण्यात आली आणि त्यानंतर त्या जया किशोरी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
11/11

मात्र, जया किशोरी स्वत:ला एक सामान्य मुलगी मानतात आणि त्यांना संत म्हणणे आवडत नाही. दोन लाखांची लेदर बॅग विमानतळावर त्यांच्या हाती दिसून आल्याने त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आले होते.
Published at : 27 Nov 2024 08:18 PM (IST)
Tags :
Jaya Kishoriअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
