एक्स्प्लोर
Eknath Shinde: महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाची चर्चा अन् अयोध्येत झळकले बॅनर; एकनाथ शिंदेंसाठी रामभक्त सरसावले!
Eknath Shinde: भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून मुख्यमंत्रिपदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे.

Eknath Shinde Ayodhya Banner
1/10

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं.
2/10

आता राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.
3/10

भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून मुख्यमंत्रिपदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे.
4/10

मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
5/10

याचदरम्यान एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून अयोध्येत बॅनरबाजी करण्यात आली आहे.
6/10

आयोध्या वासियोंकी है, पुकार एकनाथ शिंदेजी बने मुख्यमंत्री फिर एकबार...असं या बॅनरमध्ये म्हटलं आहे.
7/10

अयोध्यामधील रहिवाशांनी एकनाथ शिंदेंचे हे बॅनर लावल्याचे समोर येत आहे.
8/10

23 तारखेनंतर एकनाथ शिंदे यांनी मौन बाळगले आहे का असा प्रश्न निर्माण होतोय.
9/10

एकत्रित झालेल्या प्रेस कॉन्फरन्स नंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलणे तसे टाळले आहे.
10/10

तसेच आमदार, खासदार यांच्या भेटी देखील त्यांनी टाळल्या आहेत, त्यांच्या मौनाचे नेमके काय कारण हे कळू शकले नसले तरी एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे.
Published at : 27 Nov 2024 12:54 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
भारत
व्यापार-उद्योग
ट्रेडिंग न्यूज
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion