एक्स्प्लोर
Delhi Violence : दिल्लीमध्ये दगडफेकीनंतर हाय अलर्ट, मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात

Delhi Jahangirpuri Violence
1/10

दिल्लीतील जहांगीरपुरी येथे हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत दगडफेक करण्यात आली.
2/10

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरवणुकीत दगडफेक आणि तुरळक जाळपोळ या घटना समोर आल्या आहेत.
3/10

जहांगीरपुरी सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तसेच सुरक्षेसाठी अतिरिक्त फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.
4/10

जहांगीरपुरी गोंधळानंतर संपूर्ण दिल्लीत अलर्ट जारी करण्यात आला असून, संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
5/10

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल आणि गुन्हे शाखा या हिंसाचार प्रकरणाची चौकशी करणार आहे. यासाठी 10 पथकं तयार करण्यात आली आहेत.
6/10

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे की, 'दिल्लीतील जहांगीरपुरी येथे झालेल्या दगडफेकीची घटना अत्यंत निषेधार्ह असून दोषींवर कडक कारवाई व्हायला हवी.'
7/10

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुशल सिनेमाजवळ सायंकाळी साडेपाच ते साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.
8/10

दिल्लीच्या मध्य जिल्हा आणि ईशान्य जिल्ह्यात जिथे दिल्ली दंगल झाली तिथे मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
9/10

दिल्लीजवळच्या जिल्ह्यांमध्ये विशेष सर्तकतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
10/10

दिल्लीत झालेल्या गोंधळामुळे उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Published at : 17 Apr 2022 07:27 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सातारा
क्राईम
विश्व
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion