एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Ashadhi Wari 2023 : रुक्मिणी आणि गजानन महाराजांची पालखी आज हिंगोलीत, पाहा फोटो
गण गण गणात बोतेच्या गजरात आज संत गजानन महाराजांची पालखी हिंगोलीत पोहोचली आहे. तर रुक्मिणी मातेची पालखीही कण्हेरगावात मुक्कामी असेल.
![गण गण गणात बोतेच्या गजरात आज संत गजानन महाराजांची पालखी हिंगोलीत पोहोचली आहे. तर रुक्मिणी मातेची पालखीही कण्हेरगावात मुक्कामी असेल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/06/37af40cd0b50ab4c2d4873d3704a970b168606868145993_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ashadhi wari 2023
1/9
![रुक्मिणी मातेची पालखी आज वाशिमवरुन प्रस्थान होऊन हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करत असून आज पालखी कण्हेरगाव नाका या ठिकाणी मुक्कामी असणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/06/097a16a0534f3fb04db34f22d925ea57adbb7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रुक्मिणी मातेची पालखी आज वाशिमवरुन प्रस्थान होऊन हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करत असून आज पालखी कण्हेरगाव नाका या ठिकाणी मुक्कामी असणार आहे.
2/9
![तर शेगावहून निघालेली गजानन महाराजांची पालखी आज हिंगोलीमध्ये पोहोचली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/06/193f979a7fd1f8fb912819a7148dfeb2ae0a4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर शेगावहून निघालेली गजानन महाराजांची पालखी आज हिंगोलीमध्ये पोहोचली आहे.
3/9
![विदर्भाची पंढरी आणि आई रुक्मिणी मातेचे (Rukmini Mata) माहेर अशी श्रीक्षेत्र कोंडण्यपूरची ओळख आहे. या ठिकाणाहून श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थानतर्फे पंढरपूर वारी 23 मे रोजी प्रस्थान झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/06/a714408118dfc1bfec8e8f24d0c7ce4dc95a9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विदर्भाची पंढरी आणि आई रुक्मिणी मातेचे (Rukmini Mata) माहेर अशी श्रीक्षेत्र कोंडण्यपूरची ओळख आहे. या ठिकाणाहून श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थानतर्फे पंढरपूर वारी 23 मे रोजी प्रस्थान झाली आहे.
4/9
![आई रुक्मिणी मातेचा पायदळ पालखी दिंडी सोहळा 428 वर्षांपासून सुरु आहे. संत सदाराम महाराजांनी 1594 साली या वारीला प्रारंभ केला होता. वारीचे हे 429 वे वर्ष आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/06/a46172401012b6b34c6d84fb7e3c1a5027bf5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आई रुक्मिणी मातेचा पायदळ पालखी दिंडी सोहळा 428 वर्षांपासून सुरु आहे. संत सदाराम महाराजांनी 1594 साली या वारीला प्रारंभ केला होता. वारीचे हे 429 वे वर्ष आहे.
5/9
![आई रुक्मिणी मातेची ही पालखी अतिशय जुनी असल्याने जागोजागी या पालखीचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत केलं जाते. 25 जून रोजी ही पालखी पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/06/3d8155df688f5489f1115624214360f74616a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आई रुक्मिणी मातेची ही पालखी अतिशय जुनी असल्याने जागोजागी या पालखीचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत केलं जाते. 25 जून रोजी ही पालखी पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे.
6/9
![गण गण गणात बोते आणि विठ्ठल नामाच्या गजर करत गजानन महाराजांची पालखी मराठवाड्यात दाखल झाली आहे. गजानन महाराजांच्या पालखीचं हे 54 वं वर्ष आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/06/2a120afbc60fed1af2b239ef957ff4c43fbe7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गण गण गणात बोते आणि विठ्ठल नामाच्या गजर करत गजानन महाराजांची पालखी मराठवाड्यात दाखल झाली आहे. गजानन महाराजांच्या पालखीचं हे 54 वं वर्ष आहे.
7/9
![साडेसातशे वारकरी 550 किलोमीटरचा पायी प्रवास एका महिन्यात पूर्ण करून आषाढी एकादशीला पंढरीत पोहोचतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/06/c3a35b76c69e9105da378e000d493c2ca8761.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साडेसातशे वारकरी 550 किलोमीटरचा पायी प्रवास एका महिन्यात पूर्ण करून आषाढी एकादशीला पंढरीत पोहोचतात.
8/9
![पांढरीशुभ्र कपडे, हातात भगवा झेंडा आणि शिस्तीत चालणारे वारकरी हे या वारीचे वेगळेपण असतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/06/7edb7d608827068c622b859f8c52671bf3e4f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पांढरीशुभ्र कपडे, हातात भगवा झेंडा आणि शिस्तीत चालणारे वारकरी हे या वारीचे वेगळेपण असतं.
9/9
![आषाढी वारीसाठी दरवर्षी महाराष्ट्रातून 43 पालख्या पंढरपुरात दाखल होतात. या पालख्यांमध्ये तुकोबारायांची पालखी, माऊलींची पालखी, गजानन महाराजांची पालखी, सोपानकाकांची पालखी, मुक्ताईंची पालखी या पालख्या आकर्षणाच्या केंद्रबिंदू ठरतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/06/4c5a3ee6305dc19cd52317875cf4e9fbc50c4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आषाढी वारीसाठी दरवर्षी महाराष्ट्रातून 43 पालख्या पंढरपुरात दाखल होतात. या पालख्यांमध्ये तुकोबारायांची पालखी, माऊलींची पालखी, गजानन महाराजांची पालखी, सोपानकाकांची पालखी, मुक्ताईंची पालखी या पालख्या आकर्षणाच्या केंद्रबिंदू ठरतात.
Published at : 06 Jun 2023 09:54 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
राजकारण
जॅाब माझा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)