एक्स्प्लोर

मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी कालच शपथ घेतली. त्यावेळी, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे कालच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज त्यांना आयकर विभागाकडून (IT Dept) गुडन्यूज मिळाली आहे. आयकर विभागाने अजित पवारांची (Ajit Pawar) जप्त केलेली संपत्ती रिलीज केली असून दिल्लीतील बेनामी ट्रिब्युनलचे याबाबतचे आदेश जारी केले आहेत. अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि पत्नी सुमित्रा पवार यांची संपत्ति इनकम टॅक्स विभागाने सीज केली होती. आता, न्यायालयाच्या आदेशानुसार ती संपत्ती मुक्त करण्यात आली असून लवकरच अजित पवार यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केली जाईल. दरम्यान, 7 ऑक्टोबर 2021 मध्ये अजित पवारांच्या विविध मालमत्तेवर आयकर विभागाने छापा टाकून संपत्ती जप्त केली होती. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी कालच शपथ घेतली. त्यावेळी, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला पतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यामुळे, अजित पवारांनी कालच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज त्यांची संपत्ती मुक्त करण्यात आल्याचा निकाला बेनामी ट्रिब्युनलने दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर, राजकीय वर्तुळाताही याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे अजित पवारांनी महायुतीच्या सरकारमध्ये दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचे मिम्स आणि व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये, संचिन घोटाळा आणि राष्ट्रवादीसोबत कदापी युती शक्य नसल्याचं देवेंद्र फडणवीस बोलत असल्याचे दिसून येते. 

काय आहे नेमकं प्रकरण?

आयकर विभागाने ऑक्टोबर 2021 मध्ये छापा टाकून अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांशी कथितपणे संबंधित असलेली अंदाजे 1,000 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. अजित पवार व त्यांच्या नातेवाईकांशीृ संबंधित मुंबईतील प्रतिष्ठित नरिमन पॉइंट येथील निर्मल टॉवरसह पाच मालमत्तांवर टाच आणून ती जप्त केली होती. त्यामध्ये, एक साखर कारखाना आणि एक रिसॉर्टही जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र, याबाबत आम्ही नियमित टॅक्स भरतो, कुठलाही कर चुकवेगिरीपणा केलेला नाही, असे म्हणत अजित पवारांनी न्यायालयात दाद मागितली होती. अखेर, दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाने अजित पवारांना मोठा दिलासा देत आयकर विभागाचे अपील फेटाळले आहे. तसेच, अजित पवारांची जप्त संपत्ती मुक्त करण्याचे आदेशही दिले आहेत. 

हेही वाचा

गुवाहटीफेम माजी आमदार शहाजी बापू पाटलांची फॉर्च्युनर फोडली, सांगोल्यात शिवसैनिक संतप्त

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan Accident: आईसोबत शाळेतून घरी जाताना भरधाव ट्रक आला अन्.... कल्याणमधील अपघातात आई आणि मुलाचा मृत्यू
मोठी बातमी: कल्याणमध्ये KDMCच्या कचऱ्याच्या ट्रकने मायलेकाला उडवलं, दोघांचाही जागीच मृत्यू
Cidco Lottery 2024 : सिडकोचं सर्वात स्वस्त घर तळोजामध्ये, महाग घर खारघरमध्ये, 26000 घरांच्या किमती जाहीर, नोंदणी कशी करायची?
सिडकोचं तळोजातील स्वस्त घर 25 लाखांना, खारघरमधील सर्वात महाग घर 97 लाख रुपयांना, नोंदणी कशी करायची?
Kedar Jadhav : टीम इंडियाचा मराठमोळा खेळाडू BJP मध्ये करणार प्रवेश? 'त्या' भेटीमुळे राजकीय वर्तुळात रंगली चर्चा
टीम इंडियाचा मराठमोळा खेळाडू BJP मध्ये करणार प्रवेश? 'त्या' भेटीमुळे राजकीय वर्तुळात रंगली चर्चा
Gold Silver Rate: गुड न्यूज, सोने अन् चांदीचे दर घसरले, MCX वर काय घडलं? जाणून घ्या विविध शहरातील सोने दर
गुड न्यूज, सोने अन् चांदीचे दर घसरले, MCX वर काय घडलं? जाणून घ्या विविध शहरातील सोने दर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amol Mitkari on Suresh Dhas : 24 वर्ष जुनी केस, सुरेश धसांना घेरलं! अमोल मिटकरींचे खळबळजनक आरोपABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 08 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सJitendra Awhad PC :10 वर्षात झालेल्या खुनांपैकी 80 टक्के खून कराडनं केले, जितेंद्र आव्हाड यांचा दावा8-Year-Old Dies Of Cardiac Arrest : 8 वर्षीय मुलीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शिक्षिकेला वही दाखवत असताना आला झटका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan Accident: आईसोबत शाळेतून घरी जाताना भरधाव ट्रक आला अन्.... कल्याणमधील अपघातात आई आणि मुलाचा मृत्यू
मोठी बातमी: कल्याणमध्ये KDMCच्या कचऱ्याच्या ट्रकने मायलेकाला उडवलं, दोघांचाही जागीच मृत्यू
Cidco Lottery 2024 : सिडकोचं सर्वात स्वस्त घर तळोजामध्ये, महाग घर खारघरमध्ये, 26000 घरांच्या किमती जाहीर, नोंदणी कशी करायची?
सिडकोचं तळोजातील स्वस्त घर 25 लाखांना, खारघरमधील सर्वात महाग घर 97 लाख रुपयांना, नोंदणी कशी करायची?
Kedar Jadhav : टीम इंडियाचा मराठमोळा खेळाडू BJP मध्ये करणार प्रवेश? 'त्या' भेटीमुळे राजकीय वर्तुळात रंगली चर्चा
टीम इंडियाचा मराठमोळा खेळाडू BJP मध्ये करणार प्रवेश? 'त्या' भेटीमुळे राजकीय वर्तुळात रंगली चर्चा
Gold Silver Rate: गुड न्यूज, सोने अन् चांदीचे दर घसरले, MCX वर काय घडलं? जाणून घ्या विविध शहरातील सोने दर
गुड न्यूज, सोने अन् चांदीचे दर घसरले, MCX वर काय घडलं? जाणून घ्या विविध शहरातील सोने दर
बारामतीचा नादच खुळा... AI च्या माध्यमातून ऊस शेती, सत्या नाडेलांकडून ADT चं कौतुक; शरद पवारांचं खास ट्विट
बारामतीचा नादच खुळा... AI च्या माध्यमातून ऊस शेती, सत्या नाडेलांकडून ADT चं कौतुक; शरद पवारांचं खास ट्विट
Beed Crime: बीड शहर पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, चर्चांना उधाण
मोठी बातमी: बीड पोलीस दलातील कर्मचाऱ्याची आवळ्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
Kolhapur News : मर्जीविरोधात भाचीचा पळून जात गावातील मुलाशी लग्न, बदनामीच्या रागातून मामाने रिसेप्शनच्या जेवणात विष कालवलं!
कोल्हापूर : मर्जीविरोधात भाचीचा पळून जात गावातील मुलाशी लग्न, बदनामीच्या रागातून मामाने रिसेप्शनच्या जेवणात विष कालवलं!
Beed Crime: वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात, पोलिसांनी विष्णू चाटेचं व्हॉईस सॅम्पल घेतलं; खंडणी प्रकरणाच्या तपासाला वेग
वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात, खंडणीप्रकरणात पोलिसांनी विष्णू चाटेचं व्हॉईस सॅम्पल घेतलं
Embed widget