एक्स्प्लोर
PHOTO : मनोज जरांगेंच्या सभेसाठी तब्बल 31 क्विंटलचा पुरी-ठेचा
Manoj Jarange Sabha : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी 7 डिसेंबर रोजी हिंगोली-औंढा रस्त्यावरील डिग्रस फाटा येथे मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे.
Manogna Jarange Sabha
1/9

जरांगे यांच्या सभेसाठी येणार्या बांधवांसाठी तब्बल 31 क्विंटल पुरी-ठेचा तयार करण्याचे काम हिंगोलीतील लाखकर ग्रामस्थांनी सुरू केले आहे.
2/9

औंढा नागनाथ तालुक्यातील लाखकर येथील सर्व जाती-धर्माच्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन जरांगे पाटील यांच्या सभेसाठी 31 क्विंटलचा पुरी-ठेचा वाटण्याचा निर्णय घेतला होता.
3/9

या अनुषंगाने मंगळवारपासून गावातील शेकडो महिला, पुरूषांनी पुरी-ठेचा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.
4/9

यासाठी 31 क्विंटल आटा, 10 क्विंटल तेल, चार क्विंटल मिरची, एक क्विंटल लसण, 50 किलो जिरे असे सर्व साहित्य वापरण्यात आले आहे.
5/9

दोन दिवसांपासून संपूर्ण गाव एकत्रित येऊन यासाठी मेहनत घेत आहेत. बुधवारी पुरी-ठेच्याचे पॉकेट करून रात्री सभास्थळी नेऊन ठेवण्यात येणार आहेत.
6/9

त्यानंतर गुरूवारी चार ठिकाणी अन्नछत्र लावून या अल्पोपहाराचे वाटप केले जाणार आहे.
7/9

लाखकरांनी दाखविलेल्या एकजुटीमुळे संपूर्ण अन्नछत्राचा कार्यक्रम पार पडत असून सभास्थळी एकूण 300 क्विंटलचे अन्नछत्र ठेवण्यात आले आहे.
8/9

त्याचबरोबर 4 लाख पाणीबॉटल व 50 टॅंकरद्वारे फिल्टर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
9/9

तसेच, खिचडी, पुरीठेचा, चपाती ठेचा, चिवडी, उपमा अशा प्रकारे 300 क्विंटलचे अन्नछत्र राहणार असून, याशिवाय बिस्कीट पुडे व केळीचेही वाटप करण्यात येणार आहे.
Published at : 06 Dec 2023 04:03 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























