एक्स्प्लोर

Shrikar Pardeshi : मोठी बातमी, श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती

Shrikar Pardeshi : महाराष्ट्र केडरचे 2001 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी श्रीकर परदेशी यांची मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई  : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर आज मोठा निर्णय घेण्यात आला आहे.  2001 बॅचचे महाराष्ट्र केडरचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी श्रीकर परदेशी यांची बदली करण्यात आली आहे. श्रीकर परदेशी यांना मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.  परदेशी यांनी यापूर्वी देखील देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम केलं आहे. श्रीकर परदेशी यांनी प्रतिनियुक्तीवर पीएमओमध्ये देखील काम केलं आहे. 

श्रीकर परदेशी मुख्यमंत्र्यांचे सचिव

देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सूत्रं हाती घेतली. आज महायुती सरकारनं मोठा निर्णय घेत श्रीकर परदेशी यांची बदली केली आहे. श्रीकर परदेशी आता मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून काम पाहतील. यापूर्वी  12 जुलै 2022 रोजी श्रीकर परदेशी यांची तत्कालीन उपमुख्यमंत्र्याचे उपसचिव म्हणून बदली करण्यात आली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते. म्हणजेच आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर श्रीकर परदेशी यांची मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. 

कोण आहेत श्रीकर परदेशी?

श्रीकर परदेशी भारतीय प्रशासकीय सेवेतील 2001 च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत. त्यांनी विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त म्हणून काम केलं आहे. ते नांदेडचे जिल्हाधिकारी होते. याशिवाय पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून देखील त्यांनी काम केलं होतं. 

 दरम्यानच्या काळात श्रीकर परदेशी यांनी पंतप्रधान कार्यालयात म्हणजेच पीएमओमध्ये प्रतिनियुक्तीवर काम केलं  होतं. तो कालावधी संपल्यानंतर ते राज्यात जून 2021 मध्ये परतले होते. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार 30 जून  2022 ला स्थापन झाल्यानंतर काही दिवसांमध्येच श्रीकर परदेशी यांना सिकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरुन उपमुख्यमंत्र्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. 

श्रीकर परदेशी हे सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळचे आहेत. त्यांचं एमबीबीएस- एमडीचं शिक्षण पूर्ण झालं आहे. 2001 मध्ये ते महाराष्ट्रातून पहिल्या प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण झाले होते.  

नवं सरकार आल्यानंतरचा प्रशासनातील पहिला मोठा बदल 

श्रीकर परदेशी यांची देवेंद्र फडणवीस म्हणजेच मुख्यमंत्री यांचे मुख्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. ही बदली नव्या सरकारच्या काळातील पहिली मोठी बदली ठरली आहे. मात्र, गेल्या अडीच वर्षांपासून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या उपमुख्यमंत्रिपदाचे मुख्य सचिव म्हणून परदेशी यांनी काम केलं आहे.

इतर बातम्या :

महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार काही दिवसात, भाजपला 20-22 मंत्रि‍पदांची शक्यता? शिवसेना- राष्ट्रवादीला किती मंत्रिपदं मिळणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मंत्रालयातील लॅम्बोर्गिनी प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, VIP कारच्या मालकाचं नाव सांगितलं, म्हणाले....
मंत्रालयातील लॅम्बोर्गिनी प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, VIP कारच्या मालकाचं नाव सांगितलं, म्हणाले....
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Walmik Karad: विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी; 13 दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर ऐटीत राहणाऱ्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी ; 13 दिवस कोठडीत राहिलेल्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
Mahesh Kothe : सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतला अखेरचा श्वास
सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतलाअखेरचा श्वास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजचABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 14 January 2025Balasaheb Thackeray Smarak : बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवणार?Top 80 at 8AM Superfast 14 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मंत्रालयातील लॅम्बोर्गिनी प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, VIP कारच्या मालकाचं नाव सांगितलं, म्हणाले....
मंत्रालयातील लॅम्बोर्गिनी प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, VIP कारच्या मालकाचं नाव सांगितलं, म्हणाले....
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Walmik Karad: विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी; 13 दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर ऐटीत राहणाऱ्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी ; 13 दिवस कोठडीत राहिलेल्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
Mahesh Kothe : सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतला अखेरचा श्वास
सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतलाअखेरचा श्वास
Walmik Karad: न्यायाधीश पुन्हा वाल्मिक कराडला तोच प्रश्न विचारणार; पोलीस की न्यायालयीन कोठडी? केज न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
न्यायाधीश पुन्हा वाल्मिक कराडला तोच प्रश्न विचारणार; पोलीस की न्यायालयीन कोठडी? केज न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
Nashik Accident : सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
Nashik Accident : 135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
Beed News: बीडमध्ये आंदोलनाची धग वाढण्याचे संकेत, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय; आज मध्यरात्रीपासून 28 तारखेपर्यंत जमावबंदी
मोठी बातमी: बीड जिल्ह्यात आज रात्रीपासून जमावबंदीचे आदेश लागू, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय
Embed widget