एक्स्प्लोर
Shravan Somvar 2023 : बम बम भोले... चौथ्या अन् शेवटच्या सोमवारी औंढा नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
Hingoli News:
Shravan Somvar 2023
1/9

देशातील बारापैकी आठवं ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ.
2/9

प्रभू नागनाथाच्या दर्शनासाठी श्रावणातल्या चौथ्या सोमवारी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.
3/9

मध्यरात्रीपासूनच भाविक येथे दाखल होऊ लागले होते.
4/9

देवस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार विठ्ठल परळीकर, पोलीस निरीक्षक गणपतराव राहिरे, देवस्थानचे व्यवस्थापक सुरेंद्र डफळ यांनी महापूजा करुन दुग्धअभिषेक केलं.
5/9

मध्यरात्रीनंतर दोन वाजता मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं आहे.
6/9

भाविक अनवाणी मंदिरात दाखल झाले होते.
7/9

'बम बम भोले','श्री नागनाथ महाराज की जय'च्या जयघोषानं मंदिर परिसर दणाणला..
8/9

यावर्षीच्या श्रावण महिन्यातील आजचा शेवटचा श्रावणी सोमवार आहे.
9/9

नागनाथाच्या भक्तांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.
Published at : 11 Sep 2023 08:05 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
क्राईम
पुणे
























