Mumbai Crime : नव्या सरकारच्या शपथविधीवेळी तैनात असलेल्या पोलिसाची बॅग चोरीला, एटीएम कार्डसह महत्त्वाचा ऐवज लंपास
Mumbai Crime : शपथविधी सोहळ्यासाठी तैनात असलेल्या पोलिसाची बॅग चोरीला गेली आहे.
Mumbai Crime : मुंबईतील आझाद मैदानावर गुरुवारी (दि.6) महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर अजित पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याशिवाय मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंनी काल उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, महायुतीचा सरकारचा शपथविधी सोहळा व्यवस्थित पार पडला. मात्र, या शपथविधीसाठी तैनात असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याची बॅग चोरीला गेली आहे.
रस्त्यावर गस्त घालणाऱ्या पोलिसाची बॅग चोरीला
राज्यात नवीन सरकारच्या शपथविधी निमित्त तैनात पोलिसाची बॅग चोरीला गेली असून हा चोरीचा प्रकार सीसीटिव्हीत कैद झालाय. नव्या सरकारच्या शपतविधी निमित्त आझाद मैदान परिसरात 2500 हजारहून अधिक पोलिस तैनात होते. यावेळी रस्त्यावर गस्त घालणाऱ्या पोलिसांनी त्यांच्या बॅगा एकत्रित मनपा गेट नं 1 च्या ठिकाणी ठेवल्या होत्या. यावेळी पोलीस शपथविधीसाठी आलेली गर्दी पांगवत असताना, एका मद्यपीने एका पोलिसाची बॅग चोरली आहे.
ATM कार्ड, पैसे, कपडे आणि इतर साहित्य लंपास
मनपा गेटवरील सीसीटिव्हीत हा सर्व चोरीचा प्रकार कैद झाला आहे. दरम्यान या चोरी प्रकरणी पोलीस शिपाई तक्रार देण्यासाठी गेला असता. चोरीची तक्रार न घेता बॅग मिसिंगची तक्रार नोंदवली आहे. चोरीला गेलेल्या बॅगेत पोलिस कर्मचार्याचे ATM कार्ड, पैसे, कपडे आणि इतर साहित्य होते. पोलिसांना पोलिस ठाण्यात सहकार्य होत नसल्याने पोलिसांकडून याबाबत पोलिसांच्या व्हाॅट्स अॅप ग्रुपवर नाराजी व्यक्त केली जात आहे.
Gondia Crime News : धक्कादायक! मोबाईलचा स्फोट होऊन शिक्षकाचा मृत्यू, शेजारी असलेला व्यक्ती सुद्धा जखमीhttps://t.co/SAQ6FPop5T
— ABP माझा (@abpmajhatv) December 6, 2024
इतर महत्त्वाच्या बातम्या