एक्स्प्लोर
Gondia News: गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे भरते पोपटांची शाळा, हजारो पक्ष्यांसाठी उपाध्याय बनले अन्नदाता
पक्ष्यांच्या चिवचिवाटाने होणारी घराघरातील सकाळ आता केवळ आठवणीतील एक अनुभूती झाल्याची सध्या स्थिती आहे. हवामानातील बदल, मोबाइल टॉवरची प्रारणे, वाढते शहरीकरण अशी एक ना अनेक कारणे सांगितली जातात.

Gondia News
1/9

मात्र गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथील कमलकिशोर उपाध्याय यांच्या अंगणात दररोज सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट असतो.
2/9

उन्हाळ्यानंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात शेतशिवारामध्ये कुठलंही पिक नसते. त्यामुळे पक्ष्यांना दाण्याकरिता वणवण भटकावे लागते.
3/9

हीच बाब लक्षात घेता गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथील कमलकिशोर उपाध्याय हे गेल्या सहा वर्षांपासून पक्षांच्या दाण्याची व्यवस्था करत आहेत.
4/9

आईच्या शिकवणीमुळे पक्ष्यांवर जीव लावणाऱ्या आमगाव शहरातील गोंदिया रोडवरील रहिवासी कमलकिशोर उपाध्याय यांनी शेकडो पक्ष्यांसाठी अन्नाची सोय आपल्या घरच्या आवारात केली आहे.
5/9

मागील वर्षांपासून ते पक्ष्यांच्या दाण्याची सोय करत आहेत.
6/9

दररोज सकाळी अंगणात पक्ष्यांसाठी ते तांदूळ टाकत असून यासाठी त्यांना वर्षाला पाच ते सहा क्विंटल तांदूळ लागतो.
7/9

अंगणातील दाणे टिपण्यासाठी पोपटाचे थवे येत असून त्यांचे घर हे पोपट व इतर पक्ष्यांचे जणू माहेरच वाटत आहे.
8/9

उपाध्याय यांनी मागील सहा वर्षांपासून त्यांच्या या कार्यात कसलाही खंड पडू दिला नाही.
9/9

सकाळी पाच वाजता ते अंगणात दररोज पक्ष्यांकरता दाणे टाकत असतात.
Published at : 04 Sep 2023 10:06 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
क्रीडा
पालघर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion