Astrology : तब्बल 57 वर्षांनी जुळून येणार 'षडग्रही योग'; राहू, शनीसह अनेक ग्रह दिसतील एका रांगेत, 29 मार्चपासून 'या' 3 राशींची लॉटरी
Astrology : ज्योतिष शास्त्रानुसार, 28 मार्च रोजी चंद्राचा मीन राशीत प्रवेश होणार आहे. तर, 29 मार्च रोजी तब्बल 6 ग्रह एकत्र येणार आहेत. त्यामुळे षडग्रही योग जुळून येणार आहे.

Astrology : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक अंतराने प्रत्येक ग्रहाबरोबर संयोग (Yog) निर्माण करतात. याचा मानवी जीवनावर तर परिणाम होतोच. पण त्याचा देशविदेशातही परिणाम होतो. माहितीसाठी, लवकरच 6 ग्रहांचा मीन राशीत दुर्लभ संयोग जुळून येणार आहे. यामध्ये राहू आणि शुक्र ग्रह मार्च महिन्याच्या आधीच मीन राशीत संक्रमण करणार आहे. तर, 29 मार्च रोजी शनीचा मीन राशीत प्रवेश होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात बुधाचा मीन राशीत संक्रमण होणार आहे. त्याचबरोबर, मार्च महिन्यापासून सूर्यसुद्धा मीन राशीत संक्रमण करणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, 28 मार्च रोजी चंद्राचा मीन राशीत प्रवेश होणार आहे. तर, 29 मार्च रोजी तब्बल 6 ग्रह एकत्र येणार आहेत. त्यामुळे षडग्रही योग जुळून येणार आहे. याचा काही राशींना चांगलाच लाभ मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी षडग्रही योग फार लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या अष्टम भावात हा योग जुळून येणार आहे. त्यामुळे या काळात नोकरीच्या अनेक संधी तुमच्यासाठी उपलब्ध होतील. व्यापारी वर्गातील लोकांना परदेशातून चांगली ऑर्डर मिळेल. तसेच, तुमच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढलेले दिसतील. मित्रांचा चांगला सपोर्ट मिळेल. पैशांची गुंतवणूक करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.
धनु रास (Sagittarius Horoscope)
षडग्रही योग धनु राशीच्या लोकांसाठी फार सकारात्मक परिणाम घेऊन येणार आहे. या राशीच्या चतुर्थ भावात हा योग जुळून येणार आहे. त्यामुळे तुमच्या भौतिक सुख समृद्धीत चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना चांगली वेतनवाढ मिळेल. जोडीदाराकडून तुमच्या कार्याला सपोर्ट मिळेल. तसेच, व्यवसायाचा विस्तार वाढेल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी षडग्रही योग फार अनुकूल ठरमार आहे. या राशीच्या तिसऱ्या चरणात हा योग जुळून येणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या साहसात वाढ झालेली दिसेल. तसेच, प्रगतीच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होतील. समाजात तुमची वेगळी छाप पडेल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















