Vignesh Puthur : लाखमोलाची कौतुकाची थाप! एमएस धोनी सुद्धा झाला विघ्नेश पुथूरच्या फिरकीचा चाहता, सामना संपताच पाठ थोपटत म्हणाला तरी काय?
Vignesh Puthur : व्हिडिओमधील माहीच्या प्रतिक्रियेवरून तो विघ्नेशपासून किती प्रभावित होता हे स्पष्टपणे दिसून येते. धोनीने विघ्नेशचे कौतुक केले आणि त्याची कौतुकाने पाठ थोपटली.

Vignesh Puthur : इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल हा भारताचा असा खजिना आहे, जो दरवर्षी देशाला प्रतिभावान क्रिकेटपटू देतो. यावेळीही तिसऱ्याच सामन्यात भारताच्या युवा गोलंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 24 वर्षीय विघ्नेश पुथूर, ज्याने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्सकडून खेळून आयपीएलमध्ये पदार्पण केले.
MOMENT OF THE MATCH 🤍
— Johns. (@CricCrazyJohns) March 23, 2025
Dhoni apprecting & talking with Vignesh Puthur. pic.twitter.com/DFTMeUmsVV
विघ्नेश पुथूरची धोनीने पाठ थोपटली
फिरकीपटू विघ्नेश पुथूरने पदार्पणाच्या सामन्यातच वर्चस्व गाजवले. त्याच्या जादुई गोलंदाजीसमोर चेन्नईचे फलंदाज झुंजताना दिसले. विघ्नेशने पदार्पणाच्या सामन्यातच 3 बळी घेतले. विघ्नेशने सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे आणि दीपक हुडा यांना 4 षटकांत 32 धावा देऊन बाद केले. सामना संपल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा महान यष्टिरक्षक फलंदाज एमएस धोनी विघ्नेशचे कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही.
The men in 💛 take home the honours! 💪
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2025
A classic clash in Chennai ends in the favour of #CSK ✨
Scorecard ▶ https://t.co/QlMj4G7kV0#TATAIPL | #CSKvMI | @ChennaiIPL pic.twitter.com/ZGPkkmsRHe
एमएस धोनीने विघ्नेश पुथूरचे कौतुक केले
चेन्नई सुपर किंग्जने सामना जिंकल्यानंतर एमएस धोनी आणि विघ्नेश पुथूरची भेट झाली. त्यांच्या भेटीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमधील माहीच्या प्रतिक्रियेवरून तो विघ्नेशपासून किती प्रभावित होता हे स्पष्टपणे दिसून येते. धोनीने विघ्नेशचे कौतुक केले आणि त्याची कौतुकाने पाठ थोपटली. दोघांमध्ये थोडी चर्चा झाली. मात्र, व्हिडिओ पाहिल्यानंतर दोघांमध्ये काय संभाषण झाले हे कळू शकलेले नाही. पण माही जे काही बोलला असेल ते विघ्नेश क्वचितच विसरेल. दुसऱ्या डावात रोहित शर्माच्या जागी विघ्नेश इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आला होता.
𝘼 𝙙𝙧𝙚𝙖𝙢 𝙙𝙚𝙗𝙪𝙩 ✨
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2025
Twin strikes from the young Vignesh Puthur sparks a comeback for #MI 💙
Updates ▶️ https://t.co/QlMj4G7kV0#TATAIPL | #CSKvMI | @mipaltan pic.twitter.com/DKh2r1mmOx
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 9 गड्यांच्या मोबदल्यात 155 धावा केल्या आणि चेन्नईसमोर 156 धावांचे लक्ष्य ठेवले. यजमान संघ चेन्नईने हे लक्ष्य 19.1 षटकांत पूर्ण केले. CSK ने IPL 2025 मधील पहिला सामना 5 चेंडू आणि 4 विकेट्स शिल्लक असताना जिंकला.
इतर महत्वाच्या बातम्या























