Snehal Jagtap & Bharat Gogawale: पालकमंत्रीपदावरुन खटके उडाल्यामुळे सुनील तटकरेंची चाल? स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर भरत गोगावले म्हणाले...
Snehal Jagtap & Bharat Gogawale: जगताप कुटुंब आपल्या कार्यकर्त्यांसमवेत खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडीमधील गीताबाग निवासस्थानी गेले होते. त्यानंतर रायगडच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे.

रायगड: रायगड जिल्ह्यात सध्या भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांचं राजकीय संघर्ष सुरू आहे. आता या संघर्षात पुन्हा एकदा नव्या वादाला सुरुवात होत आहे आणि हा वाद सुरू होण्याचा मुख्य कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप (Snehal Jagtap) यांच्या सातत्याने होत असलेल्या सुनील तटकरे यांच्या सोबतच्या भेटी. लवकरच स्नेहल जगताप या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तर दुसरीकडे याच चर्चेवर जेव्हा मंत्री भरत गोगावले बोलतात तेव्हा त्यांचा संताप दिसून येतो. कोणीही कितीही एकत्र आले तरी मला फरक पडत नाही. या ठिकाणी एकच शेठ भरत शेठ, असे म्हणत गोगावले यांनी स्नेहल जगताप यांना आवाहन दिलं आहे. ते सोमवारी रायगडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
स्नेहल जगताप यांच्या वडिलांपासून आम्हाला सगळं माहिती आहे . जगताप यांचा हा पाचवा प्रवेश असेल. शिवाय त्यांच्याकडे नितीमत्ता राहिलेली नसून ज्या पक्षाने त्यांना उमेदवारी दिली त्या गोष्टीला चार महिने सुद्धा झाले नाहीत. परंतु जगताप कुटुंब जिथे जातील तिथे काय होतं, हे त्यांच्या वडिलांपासून सगळ्यांसहित अख्ख्या महाराष्ट्राला सुद्धा माहित आहे असा टोला सुधा त्यांनी स्नेहल जगताप यांना लगावला. अशा गोष्टीला संघर्ष म्हणत नाही. मागच्या वेळेस सुधा विरोधक माझ्या विरुद्ध लढले परंतु अशा संघर्षाला सुधा मी सामोरे गेलो. स्नेहल जगताप हे स्वतःला निवडून आणू शकले नाहीत तर इतरांना काय निवडून आणणार, असा टोला त्यांनी यावेळी जगताप यांना लगावला. रायगडचे पालकमंत्री पदाबाबत देखील आमचे वरिष्ठ कामाला लागलेत. तो सुद्धा प्रश्न लवकरच सुटेल, असे म्हणत गोगावले यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.
स्नेहल जगताप सहकुटुंब तटकरेंच्या निवासस्थानी
गेल्या आठवड्यात स्नेहल जगताप यांनी सहकुटुंब सुनील तटकरे यांच्या गीताबाग या निवासस्थानी भेट दिली होती. यावेळी स्नेहल जगताप आणि सुनील तटकरे यांच्यात बंद दाराआड एक तास चर्चा झाली होती. त्यामुळे स्नेहल जगताप या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे रायगडच्या राजकारणात खळबळ माजली आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर पालकमंत्री पदावरून सुनिल तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यात खटके उडाल्यानंतर सुनिल तटकरे यांची राजकीय खेळी सुरू झाल्याची देखील आता चर्चा आहे. महायुतीत नव्या वादाला वेगळं वळण मिळण्याची चर्चा आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्नेहल माणिकराव जगताप यांनी काँग्रेसमधून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीत स्नेहल माणिकराव जगताप यांना 91,232 तर भरत गोगावले यांना 1,17,442 मते मिळाली. या निवडणुकीत 26,210 मतांनी गोगावले यांचा विजय झाला होता.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

