कोण आहे कुणाल कामरा, संपत्ती किती, शिंदेंना गद्दार म्हणाला, आतापर्यंत कुणाकुणाला अंगावर घेतलं?
Kunal Kamra Net Worth : एकनाथ शिंदेंना गद्दार म्हणून उल्लेख करणाऱ्या अन् भाजपला शिंगावर घेणाऱ्या कुणाल कामराची संपत्ती किती?

Kunal Kamra Net Worth : मुंबईतील कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. कुणाल एका कॉमेडी शो दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक व्यंगात्मक गाणं म्हणत जोरदार हल्लाबोल केलाय. या गाण्यात कुणालने एकनाथ शिंदेंचा गद्दार म्हणून उल्लेख केलाय. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे शिवसैनिक आक्रमक झाले असून त्यांनी कुणाल कामराच्या कार्यालयाबाहेर निदर्शन करत निषेध व्यक्त केलाय. शिवाय कुणाल कामराच्या स्टुडिओची देखील शिवसैनिकांनी तोडफोड केलीये.
कोण आहे कुणाल कामरा?
कुणाल कामरा हा एक स्टँडअप कॉमेडिअन आहे. त्याने 2017 पासून युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून मुलाखती घेण्यास सुरुवात केली होती. कुणालने 2017 मध्ये 'शटअप कुणाल' हा कॉमेडी शो सुरु केला होता. 'शटअप कुणाल' या कॉमेडी शोमुळेच त्याला सर्वात जास्त प्रसिद्ध मिळाली होती आणि सोशल मीडियावर तो पॉप्युलर झाला होता. त्यावेळी कुणालने ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरवील, एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी, उमर खालीद, कन्हैय्या कुमार, जिग्नेश मेवानी अशा दिग्गज मंडळींच्या त्यांनी मुलाखती घेतल्या होत्या.
कुणाल कामरा यापूर्वी वादात सापडलाय
कुणाल कामराची वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अनेकदा कुणाल त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे वादात सापडलाय. काही दिवसांपूर्वीच कुणालचा ओलाचे फाऊंडर भावेश अग्रवाल यांच्याशी त्याचा वाद झाला होता. हा वाद सोशल मीडिया प्लॅटफॉर्म x वर हा वाद पाहायला मिळाला होता. हा वाद ओलाच्या स्कूटर सर्व्हिसवरुन झाला होता. दरम्यान, एवढचं नाही तर कुणाल कामराने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही सातत्याने सडकून टीका केली आहे. कुणाल कामरा हा भाजपविरोधी विचारांचा असून तो सातत्याने भाजपच्या नेत्यांना अंगावर घेताना दिसलाय.
पत्रकार अर्णब गोस्वामी बरोबर विमानात वाद
दरम्यान, पत्रकार अर्णब गोस्वामी याच्याबरोबरही कुणाल कामराचा वाद झाल होता. कुणाल आणि अर्णब 2020 मध्ये एकाच फ्लाईटमधून प्रवास करत होते. त्यावेळी कुणालने अर्णब जात असताना त्याच्याबाबत टिप्पणी केली होती. त्यानंतर इंडिगो, एअर इंडिया, गो एअर आणि स्पाईसजेटने कुणाल कामराच्या विमान प्रवासावर सहा महिन्यांसाठी बंदी घातली होती.
सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स
कुणाल कामराची युट्युब आणि सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोविंग आहे. कुणालच्या युट्यूब चॅनेलवर 2.31 मिलियन फॉलोर्स आहेत. तर इन्स्टाग्रामवर त्याचे एक मिलिअन फॉलोवर्स आहेत. मात्र, कुणाल केवळ 12 लोकांना फॉलो करत आहेत. यामध्ये कन्हैया कुमार, वरुण ग्रोवर, श्याम रंगीला यांचा समावेश आहे. x या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचे 2.4 मिलियन फॉलोअर्स आहेत.
कुणाल कामराची संपत्ती किती ?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कुणाल युट्युब आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तो कमाई करतो. कुणाल प्रत्येक शो साठी 12 ते 15 लाख रुपये कमावतो. कुणाल कामराच्या अधिकृत संपत्तीचा आकडा समोर आलेला नाही. मात्र, रिपोर्टनुसार, कुणाल कामराची संपत्ती 116 हजार डॉलर ते 696 कोटींच्या दरम्यान आहे. म्हणजे भारतीय चलनानुसार त्याची संपत्ती 1 ते 6 कोटींच्या दरम्यान आहे.























