Kunal Kamra Triggers Row Sings Song: कुणाल कामराच्या स्टँडअप स्किटमधील कोणत्या चार ओळी शिवसैनिकांना जास्त झोंबल्या? वाचा स्टार्ट टू एंड स्टोरी VIDEO
Kunal Kamra Triggers Row Sings Song: कुणाल कामरा नेमकं म्हणाला तरी काय? त्यानं गायलेलं विडंबनात्मक गाणं होतं तरी काय? सविस्तर जाणून घेऊयात...

Kunal Kamra Triggers Row Sings Song: स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामरा (Kunal Kamra) याच्याविरोधात सध्या टीकेची झोड उठली आहे. मुंबईतील (Mumbai News) खारमधील शोमध्ये कुणालनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy CM Eknath Shinde) यांच्यावर एक विडंबनात्मक गाणं गायलं आणि वादाला सुरुवात झाली. कुणालनं गायलेल्या गद्दार नज़र वो आए... गाण्यानं राज्याचं राजकारण ढवळून निघालं. एकनाथ शिंदेंवरील विडंबनात्मक गाण्यामुळे शिवसैनिक संतापले आणि थेट खारमध्ये (Khar Roda Bandra) ज्या ठिकाणी शो पार पडला, त्या ठिकाणी जाऊन पोहोचले. स्टुडिओची तोडफोड केली आणि कुणाल कामराला माफी मागण्यासाठी अल्टीमेटम दिलं. तसेच, कुणालविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला. कुणाल कामराच्या विडंबनात्मक गाण्यामुळे शिवसैनिकांसोबत शिवसेनेच्या आमदार, खासदारांच्या भावनाही दुखावल्या गेल्यात. अनेकांनी कुणाल कामराचा समाचार घेतला आहे, तर अनेकांनी कुणालला थेट इशाराही दिला आहे. पण, हे सर्व प्रकरण नेमकं कसं सुरू झालं? कुणाल कामरा नेमकं म्हणाला तरी काय? त्यानं गायलेलं विडंबनात्मक गाणं होतं तरी काय?
कुणाल कामरानं त्याच्या खारमधल्या स्टँडअप कॉमेडी शोमध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर विडंम्बनात्मक गाणं सादर केलं. हे गाणं साधारणतः तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या राजकीय भूकंपावर आधारीत असल्याचं संजय राऊतांनी ट्वीट केलं. हे सर्व प्रकरण शिवसैनिकांना भलतंच झोंबलं आणि त्यावरुन राज्याच्या राजकारणात गदारोळ सुरू झाला. कुणाल कामरा नेमकं म्हणाला काय? सविस्तर पाहुयात...
कुणाल कामरा यांनं आपल्या स्टँडअप कॉमेडी शोमध्ये म्हटलं की, शिवसेना भाजपमधून बाहेर पडली. मग शिवसेनेतून शिवसेना बाहेर पडली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून राष्ट्रवादी उदयास आली. एका मतदाराला 9 बटणं देण्यात आली. सगळे गोंधळले होते. पार्टी एका व्यक्तीनं सुरू केली होती. ती व्यक्ती ठाण्यातून येते, जो मुंबईतला एक सर्वात मोठ्या जिल्ह्यांपैकी एक आहे. त्यानंतर कुणालनं आपलं विडंम्बनात्मक गाणं सादर केलं.
साधारणतः तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या जनतेनं न भूतो न भविष्यती असा राजकीय भूकंप अनुभवला. राज्यातील प्रबळ पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवसेनेत अंतर्गत फूट पडली आणि शिवसेनेचे दोन गट पडले. ठाकरेंच्या निष्ठावंतांनी एकनाथ शिंदेंची कास धरली आणि पुढे एकनाथ शिंदेंनी थेट शिवसेना पक्षावरच दावा ठोकला आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. पुढे प्रकरण कोर्टात पोहोचलं. राज्यातलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिंदेंनी भाजपच्या साथीनं सरकार स्थापन केलं. याच भूतकाळात घडलेल्या घटनांना उजाळा देत कुणाल कामरानं विडंबनात्मक गाणं गायलं. नाव न घेता एकनाथ शिंदेंवर टीका केली. यामुळेच सध्या मोठा गदारोळ झाला आहे.
कुणाल कामरानं गायलेलं विडंबनात्मक गाणं काय?
ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आँखो पे चष्मा... हाये...
ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आँखो पे चष्मा... हाये...
एक झलक दिखलाए कभी, गुवाहाटी में छिप जाये...
मेरी नज़र से तुम देखो, गद्दार नज़र वो आए...
ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आँखो पे चष्मा... हाये...
मंत्री नहीं वो दलबदलू है, और कहा क्या जाये...?
जिस थाली में खाए, उसमें ही वो छेद कर जाए...
मंत्रालय से ज्यादा फडणवीस की गोदी में मिल जाए...
तीर कमान मिला है इसको, बाप मेरा ये चाहे...
ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आँखो पे चष्मा... हाये...
पुढे बोलताना कुणाल कामरा म्हणाला की, "ये उनकी राजनीति है। वे पारिवारिक कलह को खत्म करना चाहते थे। उन्होंने किसी के पिता को चुरा लिया। इसका क्या जवाब होगा? क्या मैं कल तेंदुलकर के बेटे से मिलूं, भाई, चलो डिनर करते हैं। मैं तेंदुलकर की प्रशंसा करता हूं और उनसे कहता हूं, भाई, आज से वे मेरे पिता हैं।"
Maharashtra ❤️❤️❤️ pic.twitter.com/FYaL8tnT1R
— Kunal Kamra (@kunalkamra88) March 23, 2025
संजय राऊतांनी ट्वीट करत शिंदेंच्या शिवसैनिकांच्या जखमेवर मीठ चोळलं
संजय राऊतांनी कुणाल कामराच्या विडंबनात्मक गाण्याचा व्हिडीओ ट्विटरवर ट्वीट केला. संजय राऊतांच्या ट्वीटनंतर शिवसैनिकांच्या उद्रेक शिगेला पोहोचला. संजय राऊत म्हणाले की, कुणाल अद्भूत आहे! जय महाराष्ट्र! कुणालनं तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या घटनाक्रमावर टीप्पणी करताना एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.
View this post on Instagram
कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कुणाल कामरानं स्टँड अप कॉमेडीमध्ये महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य केलं असून एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक टीका केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात व्हिडीओ बनवून व्हायरल करणं स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला महागात पडलंय. शिवसेना शिंदे गटाचे आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीवरून कुणाल कामराविरोधात मध्यरात्री अंधेरी पूर्वेकडील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























