एक्स्प्लोर
Ambhora Bridge Inauguration: अंभोरा केबल स्टेड ब्रीजचे आज लोकार्पण, पुलावरच 40 फूट उंचीवर 'स्काय गॅलरी'; बघा काय आहे ब्रीजची वैशिष्ट्य
Nagpur News: विदर्भातील एक महत्वाचं तीर्थक्षेत्र म्हणून आंभोर्याचा लौकिक आहे. याच अंभोऱ्यात अंभोरा केबल स्टेड ब्रीज उभारण्यात आला आहे.

Ambhora Bridge
1/9

विदर्भातील एक महत्वाचं तीर्थक्षेत्र म्हणून आंभोर्याचा लौकिक आहे. ब्रम्हगिरी पर्वतरांगांच्या मधोमध वाहणाऱ्या वैनगंगा, कन्हान, आंब, मुरजा आणि कोल्हारी या पाच नद्यांचा संगम आहे.
2/9

याच नदीच्या विस्तीर्ण पात्रावर अमेरिकेतील लॉस एंजिल्स येथील गोल्डन गेट च्या ब्रिजची प्रतिकृती उभारली गेली आहे.
3/9

भंडाऱ्यात उभारण्यात आलेल्या अमेरिकेतील गोल्डन गेट ब्रीजच्या प्रतिकृतीचं आज लोकार्पण होणार आहे. आंभोरा येथील ब्रीजमुळे नागरिकांच्या वेळ आणि अंतराची होणार बचत होणार आहे. 40 फूट उंचीच्या स्काय गॅलरीतून निसर्गाचं विहंगम दृश्ये बघता येणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लोकार्पणासाठी उपस्थित राहणार आहेत.
4/9

या पुलावर स्काय गॅलरी तयार करण्यात आली आहे. तसेच, यावर चढण्यासाठी 40 फूट उंचीची लिफ्टही लावण्यात आली आहे. गॅलरीवर उभं राहून नदी पात्र आणि परिसराचं विहंगम दृश्य पाहाता येणार आहे.
5/9

हा पूल सुरू होत असल्यानं नागपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील सुमारे 25 गावातील नागरिकांना भंडारा जिल्ह्याशी थेट संपर्क करणं शक्य होणार आहे.
6/9

किंबहुना या भागातील शेतकरी असो किंवा नागरिक यांना भंडारा येथील मार्केटचा आता थेट लाभ घेता येणार आहे.
7/9

या सोबतच शिक्षण, आरोग्यासंदर्भातील सोयीसुविधांसाठीही हा पूल सोयीचा ठरणार आहे. या पुलामुळं त्यांचं सुमारे 70 ते 80 किलोमीटरचं अंतर कमी होईल आणि वेळेचीही बचत होणार आहे.
8/9

पुलाच्या निर्मितीसाठी 176 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. या ब्रिजची लांबी 705.20 मीटर असून 15.260 मीटर रुंदीचा हा पूल आहे. शिवाय त्यावर दोन्ही बाजूने फुटपाथ आहे.
9/9

गॅलरीवर चढण्यासाठी 1020 किलो क्षमतेची लिफ्टची व्यवस्था आहे. गॅलरीवर एकाचवेळी 100 व्यक्ती उभे राहून निसर्ग सौंदर्य बघू शकतात. टी अँड टी कंपनीनं ब्रीज चं बांधकाम पूर्ण केलं आहे. कोरोना आणि महापुराला सामोरे जावून 4 वर्षात पुलाचं बांधकाम पूर्ण झाले आहे.
Published at : 13 Jan 2024 02:09 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
भारत
क्राईम
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion