एक्स्प्लोर
Aamir Khan Meet Santosh Deshmukh Family: डोळे पुसले, विराज देशमुखला कडकडून मिठी मारली अन्...; आमिर खानकडून संतोष देशमुखांच्या मुलाचं सांत्वन
Aamir Khan Meet Santosh Deshmukh Family: बीडमध्ये सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचे पडसाद फक्त महाराष्ट्रातच नाहीतर संपूर्ण देशभरात उमटले. याप्रकरणानं सर्वांनाच धक्का बसला.
Aamir Khan Meet Santosh Deshmukh Family
1/11

संतोष देशमुख हत्या प्रकरणा वाल्मिक कराडला अटक करण्यात आली, तर या प्रकरणामुळेच राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) आमदार धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.
2/11

याप्रकरणानं संपूर्ण देश हळहळला. देशमुख कुटुंबीयांची आर्त हाक ऐकून सर्वांच्या काळजाला वेदना झाल्या. तसेच, या प्रकरणाच्या चार्जशीटमधले हत्येच्या दिवशीही काही फोटो व्हायरल झाले आणि संपूर्ण महाराष्ट्र हळहळला.
3/11

संतोष देशमुखांच्या शरीराची अवहेलना करत, हाल-हाल करुन त्यांची नराधमांनी अमानुषपणे, अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. अशातच आता बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं देशमुख कुटुंबीयांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं आहे.
4/11

पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये रविवारी दुपारी पाणी फाऊंडेशनचा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम म्हणजे, पाणी फाऊंडेशनचा फार्मर कप पुरस्कार वितरण सोहळा होता.
5/11

या कार्यक्रमाच्या वेळी मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय उपस्थित होते. त्याचवेळी देशमुख कुंटुंबीय आणि आमिर खान यांची भेट झाली.
6/11

पुण्यात बालवाडी स्टेडियम येथे पाणी फाऊंडेशन च्या कार्यक्रमात अमिर खान यांनी धनंजय देशमुख, संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुख यांची भेट घेऊन सांत्वन केलं.
7/11

संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आणि संतोष देशमुखांचा मुलगा विराज देशमुख यांची अभिनेता आमिर खानची भेट घेतली.
8/11

बराच काळ आमिर खान देशमुख कुटुंबीयांसोबत चर्चा करत होता.
9/11

आमिर खानशी बोलताना, काही गोष्टी सांगताना संपूर्ण देशमुख कुटुंबियांच्या डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या होत्या. आमिर खाननं संतोष देशमुखांचा मुलगा विराज देशमुख याला कडकडून मिठी मारली आणि त्याचं सांत्वन केलं.
10/11

देशमुख कुटुंबियांशी बोलताना आमिर खाननं काहीसा भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच, पाणावलेल्या डोळ्यांनी आमिर खान विराज देशमुखला मिठीत घेऊन त्याचं सांत्वन करत होता.
11/11

आमिर खाननं काही वेळ देशमुख कुटुंबाशी चर्चा खरच सांत्वन केले यावेळी किरण राव याही उपस्थित होत्या.
Published at : 24 Mar 2025 10:16 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















