एक्स्प्लोर
Raj Thackeray: राज ठाकरेंनी भंडाऱ्यात खरेदी केलेला नवा गॉगल कसा आहे?
Raj Thackeray MNS: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे हे काल गोंदियात होते.

Raj Thackeray Vidharbha
1/8

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे हे काल गोंदियात होते, त्यानंतर आज भंडाऱ्यात भेटीगाठी घेत आहेत. (Photo Credit-ABP Majha)
2/8

राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ते भंडाऱ्यातील साकोलीमधून गडचिरोलीसाठी निघाले. (Photo Credit-ABP Majha)
3/8

राज ठाकरे साकोलीमध्ये ज्या रिसॉर्टमध्ये थांबले होते तिथून निघून शेजारीच असलेल्या मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात पाहणीसाठी पोहोचले. (Photo Credit-ABP Majha)
4/8

यावेळी राज ठाकरे यांनी मुलींच्या शासकीय वसतीगृहात जाऊन पाहणी केली आणि विद्यार्थिनींशी बातचीत केली. (Photo Credit-ABP Majha)
5/8

विद्यार्थिनीशी काही मिनिटं चर्चा करत वसतिगृहात त्या सुरक्षित आहेत की नाही, त्यांना जेवण आणि इतर सोयी योग्य पद्धतीने मिळत आहेत की नाही याची चौकशी केली. (Photo Credit-ABP Majha)
6/8

यानंतर राज ठाकरे साकोलीच्या बाजारपेठेत चष्म्याच्या दुकानात थांबून त्यांनी गॉगल घेतला. (Photo Credit-ABP Majha)
7/8

राज ठाकरे हे स्वत: गाडी चालवत होते. यावेळी त्यांच्या डोळ्यांवर नेहमीचा ब्राऊन कलरचा गॉगल होता. मात्र त्यांनी साकोलीतील एका चष्म्याच्या दुकानासमोर अचानक गाडी थांबवली आणि नवा गॉगल खरेदी केली. (Photo Credit-ABP Majha)
8/8

नवा गॉगल हा ट्रान्सफरंट आहे. भंडाऱ्यातील ढगाळ वातावरण आणि स्वत: ड्रायव्हिंग करत असल्यामुळे राज ठाकरेंनी हा ट्रान्सफरंट गॉगल घेतल्याचा अंदाज आहे.(Photo Credit-ABP Majha)
Published at : 22 Aug 2024 01:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion