एक्स्प्लोर
Advertisement

Skin Care : या मूलभूत गोष्टींकडे लक्ष दिल्यास म्हातारपणीही चेहऱ्यावर राहील चमक कायम !
स्किनकेअरशी संबंधित काही अगदी बेसिक टिप्स आहेत, ज्या तुम्ही नियमित फॉलो केल्या तर म्हातारपणातही चेहऱ्याची चमक कायम राहील !

चेहरा हा आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे, ज्याकडे महिलांपासून पुरुषांपर्यंत विशेष लक्ष दिले जाते, पण तरीही अनेकदा हवी ती चमक मिळत नाही किंवा त्यासाठी भरपूर पैसे खर्च करावे लागतात. येथे दिलेल्या टिप्सच्या मदतीने तुम्ही जास्त पैसे खर्च न करता चमकदार त्वचा मिळवू शकता.(Photo Credit : pexels )
1/10

निरोगी आणि चमकदार त्वचा प्रत्येकालाच हवी असते, पण त्यासाठी पार्लरच्या महागड्या उपचारांची गरज आहे, असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. आपल्याला फक्त योग्य काळजी घेण्याची आवश्यकता आहे. स्किनकेअरशी संबंधित काही अगदी बेसिक टिप्स आहेत, ज्या तुम्ही नियमित फॉलो केल्या तर म्हातारपणातही चेहऱ्याची चमक कायम राहील.(Photo Credit : pexels )
2/10

आठवड्यातून दोनदा चेहऱ्याला बॉडी स्क्रब करणे आवश्यक आहे. यासाठी २ चमचे बदामतेल, १ चमचा बार्लीचे पीठ आणि थोड्या प्रमाणात मध एकत्र करून पेस्ट तयार करून त्याद्वारे शरीराला स्क्रब करावे. 10-15 मिनिटांनी आंघोळ करावी. शरीरावर साचलेली घाण दूर होऊन शरीर चमकते. (Photo Credit : pexels )
3/10

दररोज चेहऱ्याची स्वच्छता ही सर्वात महत्वाची पायरी आहे. सर्वप्रथम फेस वॉशने चेहरा धुवा, नंतर क्लिंजर वापरा आणि नंतर चांगले मॉइश्चरायझ करा. (Photo Credit : pexels )
4/10

दररोज चेहऱ्याचा मसाज केल्याने दुहेरी फायदे मिळतात. एक तर यामुळे चेहऱ्याची चमक वाढते आणि दुसरं म्हणजे सुरकुत्या, डबल हनुवटीची समस्याही दूर होते. मसाजसाठी बदाम, खोबरेल तेल वापरू शकता. (Photo Credit : pexels )
5/10

चेहरा तरुण आणि चमकदार ठेवण्यासाठी आनंदी राहणं-हसणंही गरजेचं आहे. हसण्याने चेहऱ्याचे स्नायू ताणले जातात. स्माईलमुळे चेहऱ्याचे ४२ स्नायू सक्रिय होतात, जे त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असतात. (Photo Credit : pexels )
6/10

आहारात प्रोबायोटिक्सचे प्रमाण वाढवा. प्रोबायोटिक्स चांगले बॅक्टेरिया वाढवतात, ज्यामुळे पाचन समस्या दूर होतात. पोट स्वच्छ असल्याने चेहराही चमकदार राहतो. (Photo Credit : pexels )
7/10

फळांना आपल्या आहाराचा एक भाग बनवा. यासोबतच ज्यूसही प्या. ज्यूसमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. जे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात.(Photo Credit : pexels )
8/10

त्वचा निरोगी आणि तरुण ठेवण्यासाठी आहारात मीठ आणि साखर या दोन्हींचे प्रमाण काढून टाका. या एका रहस्याचा अवलंब करून तुम्ही वयाच्या 50 व्या वर्षीही तरुण दिसू शकता. (Photo Credit : pexels )
9/10

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नियमित व्यायाम करणे. यामुळे रक्ताभिसरण सुधारते, ज्याचा फायदा शरीरासह चेहरा आणि केसांना होतो.(Photo Credit : pexels )
10/10

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )
Published at : 11 Mar 2024 11:51 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
