एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!

Mahayuti Cabinet Oath Taking Ceremony : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांना महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आता महायुतीच्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महायुती सरकारचा शपथविधी सोहळा (Mahayuti Oath Ceremony) पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडणार आहे. या सोहळ्याची सध्या जोरदार तयारी केली जात आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे यांना देखील निमंत्रीत केले जाणार आहे. तसेच 19 राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. तर केंद्र सरकारमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले यांच्यासह महत्वाचे केंद्रातील पाच मंत्री देखील या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. 

'या' नेत्यांना शपथविधीचे आमंत्रण

योगी आदित्यनाथ - मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश

चंद्राबाबू नायडू - मुख्यमंत्री, आंध्रप्रदेश

नितीन कुमार - मुख्यमंत्री, बिहार

प्रेमा खांडू - मुख्यमंत्री, अरुणाचल प्रदेश

हिमंत बिश्व शर्मा - मुख्यमंत्री, आसाम

विष्णूदेव साय - मुख्यमंत्री, छत्तीसगढ

प्रमोद सावंत - मुख्यमंत्री, गोवा

भूपेंद्र पटेल - मुख्यमंत्री, गुजरात

नायब सिंह सैनी - मुख्यमंत्री, हरियाणा

मोहन यादव - मुख्यमंत्री, मध्य प्रदेश

कॉनराड संगमा - मुख्यमंत्री, मेघालय

भजनलाल शर्मा - मुख्यमंत्री, राजस्थान

मानिक साहा - मुख्यमंत्री, त्रिपुरा

पुष्कर सिंह धामी - मुख्यमंत्री, उत्तराखंड

देशातील संत महंतांनाही निमंत्रण

नरेंद्र महाराज नानीद 

नामदेव शास्त्री, भगवानगड

राधानाथ स्वामी महाराज, इस्कॉन

गौरांगदास महाराज, इस्कॉन

जनार्दन हरीजी महाराज 

प्रसाद महाराज अंमळनेरकर

महानुभाव संप्रदायाचे विध्वंस बाबा आणि मोहन महाराज

जैन मुनी लोकेश

महायुतीच्या शपथविधीत ‘एक है तो सेफ है’चा नारा दिसणार

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपने  ‘एक है तो सेफ है’चा नारा दिला होता. आता महायुतीच्या शपथविधीतही ‘एक है तो सेफ है’चा नारा दिसणार आहे. महायुतीच्या शपथविधी सोहळ्यात दहा हजार भाजप कार्यकर्ते एक है तो सेफ है, अशा आशयाचे मजकूर असलेले टी शर्ट परिधान करणार आहेत. त्यामुळे  महायुतीला विजय मिळवून दिलेल्या नाऱ्याची भाजपकडून पुनरावृत्ती केली जाणार आहे. तसेच शपथविधी काळात मराठी संगीतासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. 

आणखी वाचा 

BJP : भाजपची मंत्रिपदाची संभाव्य यादी समोर, रविंद्र चव्हाण, नितेश राणे, पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकरांच्या नावाचा समावेश

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
Embed widget